मुरुड जंजिरा : मुरु ड पंचायत समिती सभापती निवड मंगळवारी संपन्न होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आय व शेतकरी कामगार पक्षाच्या आघाडीतर्फेराष्ट्रवादीच्या आशिका अनंत ठाकूर यांचा सभापतीपदासाठी तर काँग्रेसच्या प्रणिता योगेश पाटील यांचा उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी तालुका निरीक्षक फैरोज घलटे यांनी दिली. सभापती निवडीसंदर्भात उसरोळी येथील फैरोज घलटे यांच्या निवासस्थानी आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांची सभा होऊन सदरचा निर्णय घेण्यात आला. या वेळी तालुका काँग्रेस आय पक्षाचे अध्यक्ष सुभाष महाडिक, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष इस्माईल घोले, तालुका काँग्रेस उपाध्यक्ष सुदेश वाणी, काशिनाथ महाडिक, शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस मनोज भगत, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर, गिरीश जोशी, फैरोज घलटे, पंचायत समिती सदस्य अनंत ठाकूर, आशिका ठाकूर, प्रणिता पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी सर्व पंचायत समिती सदस्य एकसंध झाले असून आघाडी जो निर्णय घेईल तो सर्वांनी मान्य केला असून सभापती निवडीत कोणतीही फूट अथवा दुरावा निर्माण होणार नाही याचा ठाम निर्णय घेण्यात आला.शिवसेनेकडून सुद्धा सभापती व उपसभापतीचे अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. यामुळे सभापती निवड एकंदर चिठ्ठीद्वारे काढण्यात येईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
मुरुडमध्ये आघाडीचा सभापतीपदासाठी अर्ज
By admin | Updated: March 14, 2017 02:15 IST