शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा आज गौरव, महाराष्ट्र भूषण पुरस्काराने होणार सन्मान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 08:53 IST

Appasaheb Dharmadhikari: या कार्यक्रमासाठी २० लाखांच्या आसपास श्री सदस्य उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

नवी मुंबई : राज्य सरकारच्यावतीने देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज १६ एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. खारघर येथे रविवारी होणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काही केंद्रीय मंत्री, राज्य मंत्रिमंडळ सदस्यांसह राज्यभरा आमदार, खासदार आणि काही उद्योजक उपस्थित राहणार आहेत. या व्हीआयपींना कार्यक्रमस्थळी पोहोचणे सोयीचे व्हावे यासाठी खारघर येथे आठ हेलिपैड उभारण्यात आले आहेत.

या कार्यक्रमासाठी २० लाखांच्या आसपास श्री सदस्य उपस्थित राहण्याची शक्यता आहे. श्री सदस्यांची गैरसोय होऊ नये यासाठी राज्य शासन, नवी मुंबई महापालिका, सिडको आणि पनवेल न महापालिकेसह नवी मुंबई पोलिस आठवडाभरापासून मेहनत घेत आहेत. वेस्ट, एनएमएमटी, टीएमटी आणि केडीएमटीच्या ११०० हून अधिक बसची सोय केली आहे, याशिवाय पार्किंग झोनची सोय केली आहे. १८ लाख ३६ हजारांवर आसनव्यवस्था तयार ठेवली आहे. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी केवळ प्रशासकीय यंत्रणाच नव्हेतर, मुख्यमंत्री एकनाथ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत, बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी जातीने लक्ष ठेवून असून, वेळोवेळी आढावा घेतला आहे.

पिण्याचे पाणी अन् फिरते शौचालयया सोहळ्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून सुमारे २५० टँकर आणि २१०० नळ बसविण्यात आले आहेत. वैद्यकीय सुविधा देखील तैनात करण्यात आली असून ६९ रुग्णवाहिका, ३५० डॉक्टर्स, १०० नर्स आणि कर्मचारी कार्यरत आहेत. ३२ फिरते शौचालय, ४२०० पोर्टेबल शौचालय, कार्यक्रमस्थळी ९००० तात्पुरते शौचालय बांधण्यात आली आहेत. स्वच्छता व्यवस्थेसाठी ६० जेटींग मशीन, ४००० सफाई कर्मचारी शिवाय २६ अग्निशमन वाहने उपलब्ध आहेत. पार्कींगसाठी २२ ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी ६०० स्वयंसेवक, २०० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

आप्पासाहेब शनिवारीच नवी मुंबईत दाखलज्यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्यात येणार आहे, त्या आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे शनिवारीच नवी मुंबईत कुटुंबासह आगमन झाले. त्यांचे उपस्थित लोकप्रतिनिधींनी जल्लोषात स्वागत केले.

अनेक ठिकाणी वाहतूक मार्गात बदखारघर शहरासह नवी मुंबई पोलिस आयुक्तालय क्षेत्रातील सर्व प्रमुख मार्गाच्या वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. मुंबई- गोवा महामार्गासह सर्वच मार्गावर शनिवारी दुपारी दोन वाजेपासून अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टीसकाळी साडे दहाच्या सुमारास या सोहळ्याला सुरुवात होणार आहे. या सोहळ्यादरम्यान, पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह धर्माधिकारी कुटुंबिय उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई