शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

एपीएमसीत खासगी वाहनांचे अनधिकृत पार्किंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 04:49 IST

खासगी वाहनांवर नियंत्रण नाही : मार्केटमध्ये रिक्षा उभ्या करण्याचे प्रमाणही वाढले

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पार्किंगची समस्या गंभीर झाली आहे. मालवाहतुकीबरोबर खासगी वाहने मोठ्या प्रमाणात उभी केली जात आहेत. १०० पेक्षा जास्त रिक्षाही उभ्या केल्या जात असून, बेकायदेशीर पार्किंगवर कारवाई करण्यात प्रशासनाला अपयश आले आहे.

बाजार समितीचे मुख्य प्रशासक सतीश सोनी यांची प्रशासनावरील पकड ढिली झाली आहे. मार्केटमधील कामकाजाला शिस्त लावण्यात अपयश येऊ लागले आहे. वरिष्ठ अधिकारी कार्यालयात बसून राहत असल्यामुळे त्यांना प्रत्यक्ष मार्केटमधील समस्या निदर्शनास येत नाहीत. अनेक दिवसांपासून पार्किंगची समस्या गंभीर झाली आहे. कांदा मार्केटमध्ये रोज ५० ते ७० रिक्षा अनधिकृतपणे उभ्या केल्या जात आहेत. रिक्षा उभ्या करण्यासाठी परवानगी दिली कोणी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. खासगी वाहनांची संख्या वाढत असून लिलावगृहामध्येही मोटारसायकल उभ्या केल्या जात आहेत. माल खाली केल्यानंतरही अवजड वाहने मार्केटमध्येच उभी करण्यात येत आहेत. फळ मार्केटमधील स्थिती सर्वात गंभीर झाली आहे. या ठिकाणी खासगी वाहने व मोटारसायकल उभ्या केल्या जाऊ नये, असे फलक लावलेल्या ठिकाणीही वाहने उभी करण्यात येत आहेत. रात्रीही २०० पेक्षा जास्त ट्रक, टेम्पो व इतर वाहने उभी करण्यात येत आहेत. भाजी मार्केटमध्येही अनधिकृत पार्किंग वाढत आहे.मसाला व धान्य मार्केटमध्ये खासगी वाहने उभी करण्यासाठीचे योग्य नियोजन नाही. पार्किंगचे धोरणच नसल्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. सकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होऊ लागली आहे. यावर कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.समन्वय नाहीएपीएमसीमधील पार्किंगच्या समस्येविषयी काही अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, व्यापारी-वाहतूकदार व प्रशासन यांच्यामध्ये समन्वय राहिलेला नाही. व्यापारी व वाहतूकदारांच्या दबावामुळे अवैध पार्किंगवर ठोस कारवाई करता येत नसल्याचे बोलले जात आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी सर्व घटकांशी समन्वय साधून धोरण निश्चित करण्याची आवश्यकता असल्याचे मत अधिकाºयांनी व्यक्त केले आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई