शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओच्या वाहनांमुळे एपीएमसीचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 23:12 IST

मसाला मार्केटमधील मध्यवर्ती सुविधागृह टप्पा दोनच्या संरक्षण कुंपणावर आरटीओ प्रशासनाने भंगार वाहने ठेवली आहेत.

नवी मुंबई : मसाला मार्केटमधील मध्यवर्ती सुविधागृह टप्पा दोनच्या संरक्षण कुंपणावर आरटीओ प्रशासनाने भंगार वाहने ठेवली आहेत. यामुळे संरक्षण कुंपण वाकले असून याकडे बाजारसमिती प्रशासनही दुर्लक्ष करत आहे. इमारत आवारामधील कचरा सफाईही वेळेवर केली जात नाही.मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला मार्केटच्या जवळच बँक व इतर कार्यालयांसाठी स्वतंत्र मध्यवर्ती सुविधागृह इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीकडे प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करू लागले आहे. देखभालीअभावी इमारती मोडकळीस आल्या आहेत. इमारतीच्या चारही बाजूला प्रशासनाने लोखंडी कुंपण केले आहे. कुंपणाला लागून आरटीओचे चाचणी मैदान आहे. या मैदानाच्या कोपऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात भंगार वाहने ठेवली आहेत. बाजार समितीच्या कुंपणावरही वाहने टाकण्यात आल्यामुळे कुंपण तुटले आहे. ही नुकसानभरपाई आरटीओकडून वसूल करणे आवश्यक आहे. पण प्रशासन त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. यामुळे कर्मचाºयांनीही नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. या इमारतीच्या आवारामध्ये ठिकठिकाणी कचºयाचे ढीग ठेवण्यात आले आहेत. परिसराची साफसफाई करून साठलेला कचरा कोपºयात ठेवला जात आहे. अस्वच्छतेमुळे या इमारतीमध्ये राहणाºयांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. बाजार समितीच्या कर्मचाºयांनीही याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. देखभाल शाखेचे स्वत:च्या मालमत्तांकडे दुर्लक्ष होवू लागले आहे. इमारतीमधील कार्यालयांचे नूतनीकरण करण्यासाठीही प्रशासनाची परवानगी घेतली जात नाही. अनेक व्यावसायिकांनी नूतनीकरण करून बांधकामाचा कचरा परिसरातच टाकला आहे. संंबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही केली असून त्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. बाजारसमितीचे कर्मचारी या इमारतीकडे दुर्लक्ष करू लागले आहेत.>आरोग्य धोक्यातआरटीओच्या भूखंडावरील भंगार वाहने, मध्यवर्ती सुविधागृह परिसरातील कचºयाचे ढीग व साफसफाईकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे डासांची संख्या वाढत आहे. याठिकाणी काम करणाºयांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून इमारत परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्याची मागणी होवू लागली आहे.