पनवेल : पांडवकडा धबधब्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या आणखी एका तरुणीचा मृतदेह शोध पथकाच्या हाती लागला आहे. आरती नायर असे या तरुणीचे नाव आहे. ती एसआयइएस महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. यापूर्वी नेहा जैन या चेंबूर नाका येथील रहिवासी असलेल्या तरुणीचा मृतदेह सकाळीच शोधपथकाच्या हाती लागला आहे. अद्यापही दोन तरुणी बेपत्ता आहेत. नेहा दत्ता आणि श्वेता नंदी असे या तरुणीची नावे आहेत. या दोघी देखील एसआयइएस कॉलेजच्या विद्यार्थिनी आहेत .
नवी मुंबईत वाहून गेलेल्या चार जणांपैकी आणखी एकाचा मृतदेह सापडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 14:50 IST