शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल पालिकेचा सुधारित अर्थसंकल्प जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 02:31 IST

पनवेल महानगरपालिकेचे २०१७-२०१८ चे सुधारित अंदाजपत्रक मनपा उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी शुक्रवारी स्थायी समितीसमोर सादर केले.

पनवेल : पनवेल महानगरपालिकेचे २०१७-२०१८ चे सुधारित अंदाजपत्रक मनपा उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी शुक्रवारी स्थायी समितीसमोर सादर केले. पनवेल महानगरपालिका मुख्यालयात पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा सुधारित अर्थसंकल्प मांडण्यात आला. विशेष म्हणजे, यापूर्वी प्रशासनाने फुगवलेला एक हजार ३५ कोटींचा अर्थसंकल्प ४३८ आला आहे. या अर्थसंकल्पात कचºयासाठी ५७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.सुधारित अंदाजपत्रकात चालू वित्तीय वर्षाचा म्हणजे २०१७-१८चा प्रत्यक्षात प्राप्त उत्पन्नाचा अंदाज घेण्यात आला असून, सुधारित करण्यात आला आहे. २०१७च्या सुधारित अर्थसंकल्पात (शिल्लक धरून) एकूण खर्च ४३८.१२ कोटी प्रस्तावित केली असून, अखेरची शिल्लक ७१.०८ कोटी प्रस्तावित केली आहे. यामध्ये एकत्रित मालमत्ता कर ५७.६० कोटी, एलबीटी ९०.०० कोटी, विकास शुल्क १५ कोटी, मुद्रांक शुल्क २४.०० कोटी, १४व्या वित्त आयोगाचे ५०.०० कोटी एलबीटी, शासन अनुदान २० कोटी व रस्ते दुरु स्तीचे १५ कोटी अशा महसुली जमा धरल्या असून, त्यामध्ये शासनाकडून विविध बाबींसाठी येणाºया ६०.७० कोटी व भांडवली जमा ७.५० कोटींचा समावेश करण्यात आला आहे.>अर्थसंकल्प वास्तववादी आहे. यापूर्वी प्रशासनाने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पाचा आकडा फुगविण्यात आला होता. मात्र, या अर्थसंकल्पात घनकचरा व्यवस्थापनासाठी ५७ कोटींची तरतूद केली असल्याने या गोष्टीचा फटका इतर विकासकामांना बसणार आहे.- हरेश केणी,स्थायी समिती सदस्य, शेकापआज मांडलेला अर्थसंकल्प हा सुधारित अर्थसंकल्प आहे. प्रशासनाने मांडलेल्या अर्थसंकल्पात दुरु स्ती करण्यात आली आहे.- अमर पाटील,सभापती, स्थायी समिती

टॅग्स :panvelपनवेल