शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अण्णासाहेब पाटील महामंडळ एक लाख लाभार्थ्यांचा टप्पा पूर्ण करणार

By नामदेव मोरे | Updated: July 8, 2024 18:39 IST

नरेंद्र पाटील यांची माहिती : मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून एक लाख उद्योजक घडविण्याचा टप्पा लवकरच पूर्ण केला जाणार आहे. याशिवाय मराठा समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट येणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली आहे.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये मराठा समाजातीक कार्यकर्त्यांची बैठक आयोजीत केली होती. या बैठकीमध्ये नरेंद्र पाटील यांनी राज्यातून आलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी समाजाच्या प्रश्नांवर चर्चा केली. महामंडळाच्या माध्यमातून लवकरच १ लाख लाभार्थ्यांचा टप्पा पूर्ण केला जाणार आहे. महामंडळाचा लाभ मिळविताना पात्रता प्रमाणपत्र, बँकांच्या कर्जाविषयी येणाऱ्या अडचणी, उद्योगाची व्याप्ती वाढविणे याविषयी उपस्थित सदस्यांनी सूचना केल्या. मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली केस. सारथी, वसतीगृह, शिष्यवृत्ती, कुणबी व मराठा नाेंदीविषयी येणाऱ्या अडचणींवरही या बैठकीत चर्चा करण्यात आल्या. समाजाच्या सर्व समस्यांविषयी निवेदन तयार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजीत पवार यांना निवेदन देवून बैठकीचे आयोजीत करण्याचे या बैठकीत निश्चीत करण्यात आले.

या बैठकीला मराठा समाजाचे राजेंद्र कोंढरे, किरण गायकर, आबासाहेब पाटील, अनंत जाधव, मधुकर घारे, अर्जुन चव्हाण, प्रकाश देशमुख, दिपक पाटील, सुरज बर्गे व इतर मान्यवर उपस्थित होते. राज्यातील मराठा चळवळीतील कार्यकर्त्यांची पुणे किंवा नाशीक येथे बैठक आयोजीत करण्यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली.

टॅग्स :Annasaheb Patil Mahamandalअण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ