शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

अण्णासाहेब पाटील महामंडळाने घडवले एक लाख उद्योजक

By नामदेव मोरे | Updated: July 30, 2024 21:29 IST

८३२० कोटीचे कर्जवाटप : ८३२ काेटी रुपयांचा व्याजपरतावा देण्यात यश

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला १ लाख मराठा उद्योजक घडविण्याचा टप्पा पूर्ण करण्यात यश आले आहे. महामंडळाच्या माध्यमातून लाभार्थींची संख्या १ लाख १४ वर पोहचली आहे. आतापर्यंत विविध बँकांच्या माध्यमातून ८३२० कोटी रुपयांची कर्ज वितरीत केली असून ८३२ कोटी रुपयांचा व्याजपरतावा देण्यात आला आहे.

राज्यातील मराठा समाजातील नागरिकांना स्वत:च्या व्यवसाय करता यावा, यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली आहे. २०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामंडळाची पुनर्रचना करून महामंडळाला निधी उपलब्ध करून नरेंद्र पाटील यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली. तेव्हापासून विविध बँकांच्या माध्यमातून व्यवसाय उभारण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यास सुरुवात झाली. कर्जावरील व्याजाची रक्कम महामंडळाच्या माध्यमातून बँकांना देण्यात येते. या माध्यमातून १ लाख उद्योजक घडविण्याचे उद्दीष्ट निश्चित केले होते. आता लाभार्थ्यांची संख्या १ लाख १४ झाली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत दुग्ध व्यवसायापासून ट्रान्सपोर्ट व इतर व्यवसाय उभारण्यासाठी समूह व वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.

मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

महामंडळाच्या माध्यमातून कर्ज घेतलेल्या लाभार्थीपैकी ९० हजार पेक्षा जास्त लाभार्थ्यांना प्रत्यक्षात व्याजपरतावा सुरू झाला आहे. आतापर्यंत तब्बल ८३२ कोटी रूपयांचा व्याजपरतावा देण्यात यश आले आहे. एक लाख उद्योजक घडविण्याचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सह्याद्री अतिथीगृहामध्ये महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील याचा सत्कार करून महामंडळाच्या कामाचे कौतुक केले. एकूण लाभार्थी - १ लाख १४बँकांमार्फत कर्जवाटप - ८३२० कोटीव्याजपरतावा - ८३२ कोटी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यभर १ लाख मराठा उद्योजक घडविण्याचे उद्दीष्ट पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर शासनाचे अधिकारी, राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांचे प्रमुख यांच्या सहकार्याने हे उद्दीष्ट पूर्ण करणे शक्य झाले.नरेंद्र पाटील, अध्यक्ष - अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई