शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

बेलापूरमध्ये अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन, दाभोळकरांच्या हत्येचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 02:54 IST

समाजात प्रत्येकाला निर्भयपणे वावरता यावे, तसेच एक सुदृढ समाज तयार करण्याच्या हेतूने रविवारी बेलापूर परिसरात निर्भय वॉकचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र अंनिसचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर व ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांचे मारेकरी अद्याप सापडले नाहीत.

नवी मुंबई : समाजात प्रत्येकाला निर्भयपणे वावरता यावे, तसेच एक सुदृढ समाज तयार करण्याच्या हेतूने रविवारी बेलापूर परिसरात निर्भय वॉकचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र अंनिसचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर व ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांचे मारेकरी अद्याप सापडले नाहीत. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र अंनिसतर्फे बेलापूर परिसरात सकाळी ७ वाजता ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ करण्यात आला.महाराष्ट्र अंनिसचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर व ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांचे मारेकरी अद्याप सापडले नाहीत. ‘आम्ही तुमच्या गोळीला घाबरत नाही, विवेकाचा आवाज बुलंद करत राहू’ असा संदेश देत हा वॉक करण्यात आला. डॉ. दाभोळकर व पानसरे हे मॉर्निंग वॉकला गेले असता, माथेफिरूंनी त्यांची गोळ्या घालून हत्या केली. दाभोळकर यांच्या हत्येला ५३ महिने उलटून गेले तरी आरोपी मोकाटच आहेत. त्यांच्या खुनानंतरच्या प्रतिकूल परिस्थितीतही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशभर वाढत आहे. राज्यभरात ठिकठिकाणी शाखा स्थापन होत असून, शिबिरे, आंदोलने, मोहिमा, संघर्ष, उपक्र मांतून या घटनेचा तीव्र निषेध केला जात आहे. कर्नाटकातील विचारवंत प्रा. एम. एन. कलबुर्गी व पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली. या सर्वांचे मारेकरी व सूत्रधार अद्याप मोकाट आहेत. याचा निषेध नोंदवत डॉ. दाभोळकर, पानसरे व प्रा. कलबुर्गी यांचे चित्र असलेले अ‍ॅप्रॉन घालून फुले, शाहू, आंबेडकर आम्ही सारे दाभोळकर या घोषणा देत, मॉर्निंग वॉक करण्यात आले. या निर्भय वॉकच्या माध्यमातून पोलीस प्रशासन, शासनाचा निषेध करण्यात आला.

टॅग्स :Narendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरNavi Mumbaiनवी मुंबईGovind Pansareगोविंद पानसरे