शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

४ दिवसांपासून माडाच्या झाडावर अडकून पडलेल्या मांजराच्या पिल्लांला वाचवण्यासाठी प्राणीमित्रांची कसरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 20:31 IST

उरण शहरातील बोरी येथील एका भंगार मालकाच्या पाळलेल्या  मांजरीच्या पिल्लाचा भटक्या कुत्र्यांनी पाठलाग केला.

उरण - पाठलाग करीत असलेल्या कुत्र्यापासून जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने ५० फूट उंचीच्या माडावर मागील चार दिवसांपासून अडकून पडलेल्या सहा महिन्यांच्या मांजरांच्या पिल्लांची प्राणीमित्र राजेश नागवेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने सुखरूप सुटका केली. 

उरण शहरातील बोरी येथील एका भंगार मालकाच्या पाळलेल्या  मांजरीच्या पिल्लाचा भटक्या कुत्र्यांनी पाठलाग केला. भक्ष्यासाठी कुत्र्यांनी जोरदार पाठलाग केला. मात्र जीव वाचवण्यासाठी मांजरीचे पिल्लू जीवाच्या आकांताने घराच्या शेजारीच असलेल्या एका ५० फूट उंचीच्या माडावर चढले. माडावर जीव वाचवण्यासाठी मागावर चढलेल्या मांजरीच्या पिल्लाला पावसामुळे निसरड्या झालेल्या माडाच्या झाडाच्या वाटेवरून उतरता येईना. त्यातच सतत कोसळणाऱ्या जोरदार मुसळधार पाऊसामुळे तीनचार दिवसांपासून मांजरीचे पिल्लू ५० फूट उंचीच्या माडावरच अडकून पडले होते.

जोरदार पावसामुळे काही काळ मालकानेही नाईलाजाने त्याकडे कानाडोळा केला. अडकून पडलेल्या मांजराच्या पिलाचे ओरडणे सातत्याने कानी पडत असल्याने अस्वस्थ झालेल्या मालकाने अखेर अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण केले होते. माडापर्यत पोहचण्यासाठी मार्ग नसल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना माघारी परतावे लागले. त्यानंतर ही बाब प्राणीमित्र राजेश नागवेकर व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांना समजल्यावर ते घटनास्थळी पोहोचले.

पावसाचा जोर कमी होताच प्राणीमित्रांनी

मांजरीच्या पिलाला वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू केले. सलग तीन तास प्राणी मित्रांचे प्रयत्न सुरू होते. प्रयत्नांना यश मिळत नव्हते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना साथ देण्यासाठी निसर्गच धावून आला. जोरदार आलेल्या वाऱ्यामुळे घाबरून बिथरलेल्या मांजरीच्या पिल्लाने ५० फूट उंचीच्या माडाच्या शेजारीच असलेल्या तितक्याच उंचीच्या असलेल्या सुरुच्या झाडाच्या फांदीवर जीवाच्या आकांताने उडी घेतली. स्वतछहून सुरुच्या झाडावरून खाली उतरूनजमीन गाठलेले पिल्लू थेट मालकाच्या हातात विसावल्याची माहिती प्राणीमित्र राजेश नागवेकर यांनी दिली. 

टॅग्स :uran-acउरण