शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

करंजा-रेवस रो-रो सेवेशी जोडणाऱ्या रस्त्याचे काम संतप्त ग्रामस्थांनी बंद पाडले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 18:51 IST

या रो-रो सेवेशी जोडणारा रस्ता करंजा येथील ऐतिहासिक द्रोणगिरी देवीच्या मंदिर आणि जवळच असलेल्या शाळेजवळून जात आहे. या रस्त्याच्या कामासाठी उत्खनन करावे लागणार आहे. रस्त्याशिवाय रो-रो सेवा खऱ्या अर्थाने कार्यान्वितच होऊच शकत नाही.

मधुकर ठाकूर -उरण : करंजा ते रेवस या मार्गावरील रो-रो सेवेशी जोडणाऱ्या रस्त्याचे काम शाळा आणि ऐतिहासिक द्रोणगिरी देवीच्या मंदिराला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने ग्रामस्थांनी बंद पाडले आहे. करंजा-रेवस सागरी मार्गावर लवकरच रो-रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. 

या रो-रो सेवेशी जोडणारा रस्ता करंजा येथील ऐतिहासिक द्रोणगिरी देवीच्या मंदिर आणि जवळच असलेल्या शाळेजवळून जात आहे. या रस्त्याच्या कामासाठी उत्खनन करावे लागणार आहे. रस्त्याशिवाय रो-रो सेवा खऱ्या अर्थाने कार्यान्वितच होऊच शकत नाही. कारण सद्यस्थीतीत असणारा करंजा जेट्टी ते उरण चारफाटा या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. याआधीच सुरू झालेल्या मच्छीमार बंदरामुळे या जुन्या रस्त्याने वाहनांची वर्दळ वाढली असल्याने वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्यातच रो-रो प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर  करंजा विभागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे.या परिसरात विनापरवाना केलेल्या अनधिकृत मातीच्या उत्खनाने जुन्या रस्त्यामध्ये मोठे खड्डे पडलेले आहेत. तसेच अनधिकृतपणे होत असलेल्या उत्खननावर कारवाई करुन या पुढे  उत्खननास परवानगी देऊ नये अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.त्यामुळे या प्रस्तावित रस्त्याला ग्रामस्थांनी याआधीच विरोध केला आहे.या विरोधानंतरही ठेकेदारांनी करंजा ते रेवस या मार्गावरील रो-रो सेवेशी जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली होती.जेसीबी यंत्राच्या साहाय्याने रस्त्यासाठी उत्खनन करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती.रस्त्याचे काम शाळा आणि ऐतिहासिक द्रोणगिरी देवीच्या मंदिराला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी बंद पाडले. ग्रामस्थांनी या भागात उत्खनन करण्याच्या कामाला याआधीच विरोध दर्शवून हरकतीही नोंदविल्या असल्याची माहिती चाणजे तलाठी तेजस चोरगे यांनी दिली. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई