शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाल्यांवरील कारवाईत दुजाभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 06:02 IST

नागरिकांच्या तक्रारीनंतर केवळ ठरावीक फेरीवाल्यांवर कारवाईचा दिखावा करत मार्जिनल स्पेसवरील फेरीवाल्यांना मात्र सूट दिली जात आहे. तर अधिकार्‍यांऐवजी सुरक्षारक्षकांनाच कारवाईसाठी पाठवले जात असल्याने पालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईबाबत साशंकता निर्माण होत आहे.

ठळक मुद्देमार्जिनल स्पेसवरील अतिक्रमणांना अभय

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : अनधिकृत फेरीवाल्यांमुळे शहराची परिस्थिती गंभीर होत असतानाही प्रशासन मात्र गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर केवळ ठरावीक फेरीवाल्यांवर कारवाईचा दिखावा करत मार्जिनल स्पेसवरील फेरीवाल्यांना मात्र सूट दिली जात आहे. तर अधिकार्‍यांऐवजी सुरक्षारक्षकांनाच कारवाईसाठी पाठवले जात असल्याने पालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईबाबत साशंकता निर्माण होत आहे.शहरात अनधिकृत बांधकामे आणि अनधिकृत फेरीवाले यांचा उपद्रव वाढत चालला आहे. भूमाफियांकडून नागरी सुविधांचे भूखंड लाटले जात असून, फेरीवाल्यांनी रस्ते व पदपथ गिळंकृत केले आहेत. यामुळे पादचार्‍यांना चालण्यासाठी पदपथ राहिले नसून, ठिकठिकाणी वाहतूककोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. महापालिका क्षेत्रातील प्रत्येक विभाग कार्यालय क्षेत्रात हे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, यासंदर्भात अनेकांनी सातत्याने तक्रारी करूनदेखील अनधिकृत फेरीवाल्यांवर ठोस कारवाई होत नसल्याचा संताप नागरिक व्यक्त करत आहेत. गतवर्षी तत्कालीन पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बर्‍या प्रमाणात शहराला फेरीवाल्यांच्या विळख्यातून सोडवले होते. मात्र, त्यांच्या बदलीनंतर शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांनी पुन्हा रस्ते व पदपथ व्यापल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे विद्यमान आयुक्त रामास्वामी एन. यांच्या भूमिकेकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. बहुतांश अनधिकृत फेरीवाले शहराबाहेरचे असून त्यांना प्रशासनातीलच काही अधिकार्‍यांचे छुपे पाठबळ मिळत असल्याचाही नागरिकांचा आरोप आहे. यामुळेच निश्‍चित ठिकाणी कारवाईपूर्वी फेरीवाले दिसेनासे होवून व पथक जाताच पुन्हा धंदा मांडतात. या संपूर्ण चक्रामागे अर्थपूर्ण हितसंबंध असून त्यात प्रशासनातील अधिकार्‍यांचाही सहभाग असल्याचा आरोप संतप्त नागरिकांकडून होत आहे.नागरिकांची तक्रार आल्यास त्याठिकाणी पालिकेचे वाहन कारवाईच्या उद्देशाने येते. मार्जिनल स्पेसवरील वडापाव, फेरीवाले वगळता फक्त फेरीवाल्यांना हटवले जाते असल्याचे गुरुवारी प्रत्यक्ष निदर्शनास आले. मात्र, मार्जिनल स्पेसवरील फेरीवाल्यांना आश्रय देण्यामागच्या अधिकार्‍यांच्या भूमिकेचा उलगडा होऊ शकलेला नाही, तर काही नागरिकांनी फेरीवाल्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केल्यानंतर पोलीस सहकार्य करत नसल्याची कारणे पुढे केली जात आहेत. 

टॅग्स :Mumbaiमुंबई