शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

...अन् थोडक्यात टळला एन्काउंटर, पाठलाग करून पकडले चौघांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 01:39 IST

बडोदा बँक लुटणारी टोळी पकडण्याकामी पोलिसांना अनेक ठिकाणी जीवावर उदार व्हावे लागले. त्यापैकी गुन्ह्यातील पहिल्या चौघांना अटक करतेवेळी बैंगणवाडी येथे पोलिसांना पाच किलोमीटर

नवी मुंबई : बडोदा बँक लुटणारी टोळी पकडण्याकामी पोलिसांना अनेक ठिकाणी जीवावर उदार व्हावे लागले. त्यापैकी गुन्ह्यातील पहिल्या चौघांना अटक करतेवेळी बैंगणवाडी येथे पोलिसांना पाच किलोमीटर गुन्हेगारांचा फिल्मी स्टाइलने पाठलाग करावा लागल्याने त्या ठिकाणी एन्काउंटरचा प्रसंग निर्माण झाला होता.सुमारे अंदाजे २५ फूट लांब भुयार खोदून बडोदा बँक लुटल्याची जुईनगर येथील घटना देशात दुसरी व राज्यात पहिली होती. यामुळे सदर गुन्ह्याचा उलगडा करून टोळीला अटक करण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले होते. बँक लुटणारे सराईत गुन्हेगार असल्याने त्यांनी मागे कसलाही पुरावा ठेवलेला नव्हता. अखेर भुयारामध्ये सापडलेले वर्तमानपत्र पोलिसांना महत्त्वाचा सुगावा ठरले. हे वृत्तपत्र उत्तर प्रदेशचे असल्याने पोलिसांना ऐन वेळी तपासाची दिशा बदलावी लागली. या दरम्यान, भुयार खोदण्यासाठी दुकान भाड्याने घेतल्यानंतर त्यावर लावलेल्या साईन बोर्डवर लिहिलेला मोबाइल नंबर पोलिसांनी तपासला असता, ठरावीक दिवसांसाठीच तो वापरून बंद झाल्याचेही समजले. त्यामधून मालेगावच्या राजेंद्र वाघ याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांचे एक पथक त्याच्यावर पाळत ठेवून असताना, त्यांच्याही जीवाला धोका निर्माण झाला होता. दरम्यान, वाघच्या संपर्कातील मुंबईतील संशयिताची माहिती लागली. त्याआधारे एक पथक चेंबुरमध्ये सापळा रचून असतानाच, गुन्ह्या वेळी बडोदा बँकेच्या आवारात थांबलेल्या संशयित कारची माहिती हाती लागली. तीच कार चेंबुरमध्ये असून संशयित व्यक्तीही त्यातून फिरत असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार वाशी टोलनाक्यासह चेंबुर परिसरात पोलिसांनी सापळा रचला होता. या वेळी चेंबुरमधील पथकाच्या नजरेसमोरून संशयित कार गेल्याने त्यांनीही खासगी कारमधून पाठलाग सुरू केला; परंतु गुन्हेगारांना याची चाहूल लागल्याने तेही पोलिसांना चकमा देण्याच्या प्रयत्नात वेगाने कार पळवू लागले.नजरेस पडलेले गुन्हेगार हातून निसटतील, या भीतीने जीवावर उदार होऊन पोलिसांनी सुमारे पाच कि.मी.चा पाठलाग करून गुन्हेगारांच्या कारसमोर त्यांची कार लावली. यामुळे आपल्याला पोलिसांनी घेरल्याचे लक्षात येताच गुन्हेगारांनी कारचे दरवाजे लॉक करून स्वत:ला कोंडून घेतले; परंतु त्यांच्या हालचाली प्रतिहल्ल्याच्या दिसल्याने पोलिसांना बचावासाठी त्यांच्या दिशेने बंदूक रोखावी लागली.या प्रकारामुळे काही मिनिटांसाठी बैंगणवाडीत भररस्त्यात थरार नाट्य सुरू होते. मात्र, आपली सुटका अशक्य असल्याचे लक्षात आल्यानंतर गुन्हेगारांनी स्वत:कडील शस्त्रे खाली टाकल्यानंतर पोलिसांनी झडप टाकून त्यांना ताब्यात घेतले. त्यामध्ये हाजीद शेख, श्रावण हेगडे उर्फ सतीश कदम, मोमीन खान व अंजन महांतो यांचा समावेश होता. त्यापैकी हाजीद हाच गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे उघड झाले. झडतीमध्ये त्यांच्याकडे रामपुरी चाकूसह इतरही धारदार शस्त्रे आढळून आली.

टॅग्स :ArrestअटकThiefचोर