शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

११ फुट लांबीच्या ४० किलो वजनाच्या अजगराने भटक्या कुत्र्याला गिळले; अजगराला जंगलात सोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2023 12:46 IST

संवेदनशील प्राणी मित्रांनी केले कुत्र्यावर अंत्यसंस्कार

मधुकर ठाकूर

उरण : उरण -कळंबुसरे गावातील राईस मिलमध्ये दिवसाढवळ्या शिरूर भटक्या कुत्र्याला गिळलेल्या एका ११ फुट लांबीच्या इंडियन पायथॉन जातीच्या अजगराला चिरनेर येथील वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी अजगराची सुटका करून त्याला इंद्रायणी जंगलातील नैसर्गिक मुक्त वातावरणात सोडून दिलेच.त्याशिवाय संवेदनशील प्राणी मित्रांनी  मृत कुत्र्यावर अंत्यसंस्कारही करून भुतं दयेचा पायंडा पाडला आहे.

 उरण तालुक्यातील कळंबूसरे गावातील बंद असलेल्या राईस मिलमध्ये शुक्रवारी (१०) १०.३० वाजताच्या सुमारास एक ११ फुट लांबीचा आणि ४० किलो वजनाचा इंडियन पायथॉन जातीचा अजगर घुसला.भक्षाच्या शोधार्थ दिवसाढवळ्या नागरी वस्तीत शिरलेल्या अजगरांना पाळीव कुत्र्याला गिळले. राईसमिलच्या शेजारीच असलेल्या शिवप्रसाद भेंडे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लागलीच परिचित असलेल्या चिरनेर येथील वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या सदस्यांना माहिती दिली.

संस्थेचे अध्यक्ष विवेक केणी आणि सदस्य महेश भोईर, महेश ठाकूर यांनी लागलीच राईसमिलकडे धाव घेतली.कुत्र्याला गिळून निपचिप पडलेल्या अजगराला वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी मोठ्या प्रयासाने आणि शिताफीने पकडले .वनकर्मचारी संतोष इंगोळे, राजेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत चिरनेरच्या इंद्रायणी जंगलातील नैसर्गिक आवासात सोडून दिले.मृत भटक्या कुत्र्यालाही खड्डा खोदून गाडून टाकुनी अंत्यसंस्कार करण्यात आले.