शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई मनसेचे नेतृत्व अमित ठाकरेंकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 02:45 IST

महापालिका निवडणुकीच्या अनुशंगाने नवी मुंबई मनसेची धुरा युवा नेते अमित ठाकरे यांनी हाती घेतली आहे.

नवी मुंबई : महापालिका निवडणुकीच्या अनुशंगाने नवी मुंबईमनसेची धुरा युवा नेते अमित ठाकरे यांनी हाती घेतली आहे. त्यानुसार प्रत्येकाच्या गाठीभेटीवर भर दिला जात असून पुढील काळात अमित ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आंदोलनेदेखील केली जाणार आहेत. अशातच मनसेला लागलेली गळती रोखण्याचे आव्हान शहर अध्यक्षांपुढे निर्माण झाले आहे.राज्यातल्या राजकारणात उलथापालथ सुरू असतानाच नवी मुंबई मनसेतदेखील गळती सुरू झाली आहे. महापालिका निवडणुकीचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून मनसेचे संदीप गलुगडे, नितीन चव्हाण तसेच श्रीकांत माने यांनी मनसेची साथ सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यांच्या पाठोपाठ इतरही काही जण पक्ष सोडण्याच्या मार्गावर असल्याचे समजते. मनसेच्या ध्येय व धोरणाविषयी नाराजी व्यक्त करीत दुसऱ्या पक्षाचा मार्ग निवडल्याचे त्यांच्याकडून सांगितले जात आहे. याकरिता राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह विद्यमान जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांच्या ते संपर्कात होते.मात्र मागील एक महिन्यापासून मनसे जिल्हाध्यक्ष गजानन काळे यांच्याकडून त्यांची मनभरणी सुरू होती. यानंतरही त्यांनी पक्षांतराच्या निर्णयावर ठाम राहून नुकताच राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेल्या या गळतीमुळे गजानन काळे यांच्यापुढे आव्हान निर्माण झाले आहे.आगामी महापालिका निवडणुकीत मनसे रिंगणात उतरणार असल्याचे नुकतेच मनसेच्या नेत्यांनी नेरुळमध्ये झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. त्यानुसार अमित ठाकरे यांच्याकडे नवी मुंबईची धुरा देण्यात आली असून, मागील काही दिवसांपासून ते सातत्याने नवी मुंबईत बैठका व सभा घेऊन पक्ष बळकटीचा प्रयत्न करत आहेत.याशिवाय अमित ठाकरे यांच्या राजकीय आंदोलनांची सुरुवातदेखील नवी मुंबईतूनच केली जाणार आहे. याकरिता अमित ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पुढील काही दिवसांत वेगवेगळी आंदोलने केली जाणार आहेत. त्यामुळे नवी मुंबईत मनसेला लागलेली गळती रोखण्यासाठी अमित ठाकरे यांना आपले नेतृत्व कौशल्य पणाला लागणार आहे.

टॅग्स :MNSमनसेNavi Mumbaiनवी मुंबई