शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईत पार्किंगच्या नियमावलीत सुधारणा करा; उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 09:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : नवी मुंबईत नियोजनबद्ध पार्किंगची सुविधा असावी, यासाठी ऑक्टोबर २०१६ मध्ये दिलेल्या आदेशाकडे दुर्लक्ष करून ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नवी मुंबईत नियोजनबद्ध पार्किंगची सुविधा असावी, यासाठी ऑक्टोबर २०१६ मध्ये दिलेल्या आदेशाकडे दुर्लक्ष करून २०२० मध्ये नवी मुंबईसाठी तयार करण्यात आलेल्या विकास नियमावलीमध्ये पार्किंगच्या दृष्टीने आवश्यक ती सुधारणा करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने  राज्य सरकार व नवी मुंबई महापालिकेला शुक्रवारी दिला. 

नवी मुंबईतील लोकसंख्येच्या अनुषंगाने पार्किंगच्या आवश्यक जागेबाबत महापालिकेच्या तज्ज्ञ समितीने चार महिन्यांत अभ्यासपूर्ण अहवाल सादर करावा आणि त्यानंतर राज्य सरकार व नवी मुंबई महापालिकेने विकास नियमावलीत आवश्यक ती सुधारणा करण्यासाठी पावले उचलावीत आणि ही सर्व प्रक्रिया एका वर्षात पूर्ण करावी, असे आदेश मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने दिले.

नवी मुंबईचे रहिवासी संदीप ठाकूर यांनी विकास नियमावलीला उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यापूर्वी उच्च न्यायालयाने त्यांच्याच  जनहित याचिकेवर ५ ऑक्टोबर २०१६ मध्ये महापालिकेला प्रत्येक विकासकाला प्रत्येक फ्लॅटधारकासाठी  ४५ चौरस मीटरच्या बिल्डअप एरियाचे पार्किंग उपलब्ध करणे बंधनकारक करण्याचे आदेश दिले होते.

प्रक्रिया १ वर्षात पूर्ण करा नवी मुंबई महापालिकेने पालिकेच्या हद्दीत पार्किंगच्या जागेची किती आवश्यकता आहे, याबाबत अभ्यास करून २०२०च्या विकास नियमावलीत आवश्यक ते बदल करण्यासाठी शिफारशी कराव्यात व तसा अहवाल सादर करावा.  हा अभ्यास पालिका आयुक्तांनी नेमलेल्या तज्ज्ञ समितीने करावा आणि चार महिन्यांत अहवाल तयार करावा. एमआरटीपी कलम ३७ अंतर्गत पार्किंगसंदर्भात हरकती व सूचना मागवून विकास नियमावलीमध्ये आवश्यक ती सुधारणा करावी आणि ही सर्व प्रक्रिया एका वर्षात पूर्ण करावी, असे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकार व नवी मुंबई महापालिकेला दिले.  पार्किंगसंदर्भात त्रुटी  या नियमावलीत पार्किंगसंदर्भात काही त्रुटी होत्या. उच्च न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून रस्त्याच्या बाजूला, दुकाने व रो-हाऊससाठी पार्किंगच्या सुविधेची तरतूद करण्यात आली नाही. पालिकेच्या लोकसंख्येचा विचार करून पार्किंगची सुविधा करण्यात आलेली नाही, असा आरोप ठाकूर यांनी याचिकेद्वारे केला आहे.

टॅग्स :Courtन्यायालयParkingपार्किंग