शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
3
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
4
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
5
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
6
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
7
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
8
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
9
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
10
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
11
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
12
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
13
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
14
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
15
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
16
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
17
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
18
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
19
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
20
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर

रुग्णवाहिका नावापुरत्याच!

By admin | Updated: August 6, 2015 23:45 IST

मोफत अंत्यसंस्कार करणारी नवी मुंबई महानगरपालिका अपघातग्रस्त व इतर रुग्णांना जीवनदान देण्यासाठी रुग्णवाहिका पुरविण्यास टाळाटाळ करत आहे. पालिकेची

नामदेव मोरे ,  नवी मुंबई मोफत अंत्यसंस्कार करणारी नवी मुंबई महानगरपालिका अपघातग्रस्त व इतर रुग्णांना जीवनदान देण्यासाठी रुग्णवाहिका पुरविण्यास टाळाटाळ करत आहे. पालिकेची सुविधा नसल्याने नाइलाजाने खाजगी रुग्णवाहिकांचा आधार घ्यावा लागत आहे. पालिकेची अत्याधुनिक फ्लोटिंग अ‍ॅडव्हान्स कॅज्युलिटी कॉम्प्लेक्स म्हणजेच ‘फॅक’ वाहनेही एक वर्षापासून धूळखात पडून आहेत. महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेविषयी नागरिकांमध्ये असंतोष आहे. शहरवासीयांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात पालिका पूर्णपणे अपयशी ठरली आहे. मोफत अंत्यविधी करणारी नवी मुंबई देशातील एकमेव महापालिका आहे, मात्र व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी अत्यावश्यक सुविधा दिल्या जात नाहीत. नवी मुंबईमध्ये सायन-पनवेल महामार्ग, ठाणे-बेलापूर रोड, पामबीच रोडवर मोठ्या प्रमाणात अपघात होतात. या अपघातग्रस्तांना महापालिकेची रुग्णवाहिका मिळत नाही. पालिकेत फोन केल्यास, ‘आम्ही रुग्णवाहिका देत नाही. आमच्या रुग्णालयातून रुग्ण इतर ठिकाणी घेऊन जाण्यासाठीच त्याचा वापर केला जातो,’ असे सांगितले जाते. महापालिकेच्या २० रुग्णवाहिका आहेत. यामधील ७ रुग्णवाहिका भंगारात गेल्या आहेत. उर्वरित १३पैकी ५ वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालय व ५ माताबाल रुग्णालयांमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. एका रुग्णवाहिकेमध्ये फिरता दवाखाना असून २ रुग्णवाहिका बिघडल्या आहेत. पालिका रुग्णालयामध्ये रुग्णवाहिका उभ्या असल्या तरी विविध कारणांनी सेवा नाकारली जाते. त्यामुळे नाइलाजाने खाजगी रुग्णवाहिकांचा आधार घ्यावा लागत आहे. नवी मुंबई नगरपालिकेने अपघात झाल्यानंतर रुग्णांना तत्काळ उपचार देण्यासाठी गतवर्षी दोन अत्याधुनिक फॅक व्हॅन खरेदी केल्या.लोकप्रतिनिधींचा आधार : शहरात नगरसेवक व इतर लोकप्रतिनिधींनी रुग्णवाहिका सेवा सुरू केली आहे. विजय माने, सोमनाथ वास्कर, दिलीप आमले व इतर अनेक जण तत्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करून देतात. शुक्रवारी एका अपघातानंतर मध्यरात्री २ वाजता रुग्णास डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालयामधून वाशीतील एमजीएम रुग्णालयात तत्काळ हलविणे आवश्यक होते. तेव्हा नेरूळचे नगरसेवक सूरज पाटील यांनी रुग्णवाहिका देण्याची तयारी दर्शवून रुग्णाचा जीव वाचविला. अशा लोकप्रतिनिधींचा अपवाद वगळता खासगी रुग्णवाहिका गरज पाहून नागरिकांकडून जादा पैसेच उकळण्याचा प्रयत्न करताना दिसतात. सरकारच्या रुग्णवाहिकेचीही दिरंगाईकेंद्र व राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने राष्ट्रीय रुग्णवाहिका सेवा सुरू केली आहे. १०८ या टोल फ्री नंबरवर संपर्क साधून रुग्णवाहिका कुठेही बोलविता येते. नेरूळ रेल्वे स्टेशनच्या बाहेरच सरकारची रुग्णवाहिका २४ तास उभी असते. परंतु दोन दिवसांपूर्वी पदपथावर महिलेची प्रसूती झाल्यानंतर या रुग्णवाहिकेसाठी चालकच नसल्याचे निदर्शनास आले. यामुळे ही सुविधाही वेळेत मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.