शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

चोरी पकडल्याने रुग्णवाहिका चालकाची हत्या; फेरीवाल्यांची दहशत

By सूर्यकांत वाघमारे | Updated: November 27, 2023 17:35 IST

नेरूळमध्ये रुग्णालयाबाहेरच भररस्त्यात थरार

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : एका फेरीवाल्याकडून दुसऱ्या फेरीवाल्याच्या मालाची चोरी होताना फोटो काढल्याने रुग्णवाहिका चालकाची हत्या केल्याची घटना नेरूळमध्ये घडली आहे. डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या बाहेरच हा थरारक प्रकार घडला. या घटनेवरून पुन्हा एकदा नेरुळ परिसरातली फेरीवाल्यांची गुंडगिरी उघड झाली आहे.

नेरुळ येथील डी. वाय. पाटील रुग्णालयाबाहेर रविवारी रात्री हि घटना घडली आहे. रुग्णालयाबाहेर पदपथावर भुर्जी पाव, नारळपाणी तसेच इतर फेरीवाल्यांच्या गाड्या लागत असतात. त्याच परिसरात खासगी रुग्णवाहिका देखील उभ्या केलेल्या असतात. त्यामुळे रुग्णवाहिकांचे चालक परिसरात बसून असतात. स्पंदन कार्डिक रुग्णवाहिकेचा चालक युवराज सिंह (३०) याने काही दिवसांपूर्वी तिथल्या फेरीवाल्यांच्या चोरीचे फोटो काढले होते. परिसरात भुर्जी पाव व वडापाव विकणाऱ्याने व त्याच्या मित्राने मनोज साबणे याच्या टेम्पोतून नारळ चोरले होते. हा प्रकार युवराज याने फोटोसह मनोज याला सांगितला होता. त्यावरून काही दिवसांपासून त्या दोघांमध्ये वाद सुरु होता. रविवारी रात्री एकाने युवराज याला फोन करून भेटीसाठी रुग्णालयाबाहेर बोलवले होते. त्यानुसार सहकारी ज्ञानेश्वर नाकाडे याच्या रुग्णवाहिकेतून युवराज हा डी. वाय. पाटील रुग्णालयाकडे चालला होता. त्यांची रुग्णवाहिका रुग्णालयाच्या परिसरात पोहचताच दबा धरून बसलेल्या चौघांनी युवराज याच्याव जीवघेणा हल्ला केला. त्यामध्ये काहींनी काचेचे भांडे डोक्यात मारले तर एकाने गळ्यात चाकू भोसकला. तर रुग्णवाहिकेवर देखील त्यांनी हल्ला केल्याने ज्ञानेश्वर याने तिथून पळ काढून स्वतःचा जीव वाचवला. या घटनेनंतर पोलिस घटनास्थळी दाखल होताच युवराज याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. 

याप्रकरणी चौघांवर नेरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रात्री उशिरा एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याद्वारे इतरही तिघांना अटक केली जाईल असा विश्वास नेरुळ पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. मात्र या घटनेवरून नेरुळ परिसरातली अनधिकृत फेरीवाल्यांची गुंडगिरी पुन्हा एकदा समोर आली आहे.

रुग्णालयाबाहेरच घडलेल्या या थरारक घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. तर गुन्हेगारांवर पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याने त्यांची गुंडगिरी वाढली आहे. किरकोळ गॅरेज कामगारांवर कारवाईत पुढे असणारे पोलिस गुन्हेगारी प्रवृत्तीच्या फेरीवाल्यांवर कारवाई करत नसल्याचा संताप नागरिक व्यक्त करत आहे. त्यामुळे पोलिसांवर देखील गुन्हेगारांची दहशत आहे का ? अशीही शक्यता वर्तवली जात आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी