शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अडीच कोटींच्या मुद्देमालाचे वाटप, ८० नागरिकांनी मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 00:46 IST

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील २० पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेला मुद्देमाल गुरुवारी तक्रारदारांना परत करण्यात आला.

नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील २० पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेला मुद्देमाल गुरुवारी तक्रारदारांना परत करण्यात आला. नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्या हस्ते एकूण दोन कोटी ५० लाख ८७ हजारांचा मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशानुसार एकूण ८० तक्रारदारांना परत करण्यात आला. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या बेलापूर मुख्यालयाच्या आवारात कार्यक्रम संपन्न झाला.महाराष्ट्र पोलीस दलाच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने २ ते ८ जानेवारी दरम्यान रायझिंग डेनिमित्त सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. नवी मुंबईत दररोज कुठे ना कुठे चेनस्नॅचिंग, मोबाइल, वाहनचोरीच्या घटना घडत असतात. परिमंडळ एक आणि दोनच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्यातील एकूण दोन कोटी ५० लाख ८७ हजार रुपयांचा माल पोलिसांनी हस्तगत केला आहे. यात विविध प्रकारची वाहने, सोन्या-चांदीचे दागिने यांचा समावेश आहे.वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील, तक्रारदार अशोक बडोला यांना त्यांचे चोरीस गेलेले ५९ लाख ५१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने परत करण्यात आले. यांच्यासह एकूण ८० नागरिकांना त्यांचा मुद्देमाल परत करण्यात आला. या वेळी पोलीस सहआयुक्त राजकुमार व्हटकर, पोलीस उपायुक्त प्रवीण कुमार पाटील, सुरेश मेंगडे, पंकज डहाने, शिवराज पाटील आदी उपस्थित होते.>पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करावे तितके थोडे आहे. आज आमचे चोरीला गेलेले सोने परत मिळाल्याने खाकी वर्दीवरील विश्वास आणखी बळावला असून पोलीस आपले काम उत्तम रीत्या पार पडत असल्याचे समाधान आहे.- दिनकर अहिरे, तक्रारदार>माझे १२ लाख रुपये किमतीच्या बांधकामासाठी लागणारे मशिन चोरीला गेले होते. त्याचा पोलिसांनी छडा लावला आहे. कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड आणि त्यांच्या पोलीस सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो.- नितीन शेळके, कळंबोली