शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विम्याचे ६१ हजार कुटुंबांना वाटप

By admin | Updated: June 21, 2016 01:41 IST

राजकारणाबरोबरच समाजकारणातही अग्रेसर असलेल्या माजी आमदार विवेक पाटील यांनी वाढदिवसानिमित्त ६१ हजार कुटुंबांना आरोग्य विम्याचे वाटप केले.

पनवेल : राजकारणाबरोबरच समाजकारणातही अग्रेसर असलेल्या माजी आमदार विवेक पाटील यांनी वाढदिवसानिमित्त ६१ हजार कुटुंबांना आरोग्य विम्याचे वाटप केले. रविवारी कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीत पार पडलेल्या या कार्यक्रमापूर्वी ब्राझील येथील रियो आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या आयोनिका पॉल हिला सहकार्य करण्यासाठी उभारण्यात आलेल्या अद्ययावत शूटिंग रेंजचे उद्घाटन राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात माजी मंत्री पतंगराव कदम, राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील, माजी मंत्री गणेश नाईक, आमदार पंडित पाटील, आमदार धैर्यशील पाटील, आमदार सुरेश लाड, आमदार नरेंद्र पाटील, माजी मंत्री मीनाक्षीताई पाटील, आरपीआय डेमोक्र ॅटिकचे अध्यक्ष कनिश्क कांबळे, राष्ट्रवादीचे रायगड जिल्हा अध्यक्ष वसंत ओसवाल आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी शरद पवार म्हणाले, सिडकोचा साडेबारा टक्केचा लढा असो, जेएनपीटीमधले प्रश्न असो वा प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सर्वच लढ्यात शेतकरी कामगार पक्षाने नेहमीच आवाज उठवला आहे. राजकारणाबरोबरच समाजकारणातही अग्रेसर असलेल्या विवेक पाटील यांनी कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीची उभारणी करून खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण केला आहे. या अकादमीच्या माध्यमातून अनेक खेळाडू आज उत्कृष्ट कामगिरी करीत असून देश-विदेशात चमकत असल्याचे प्रतिपादन पवार यांनी केले. विवेक पाटील यांची कार्य करण्याची ऊर्जा ही तरुणांना लाजवणारी असल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला. शेकापचे नेते जयंत पाटील यांनी पनवेलसारख्या शहरात जागतिक दर्जाचे शूटिंग रेंज तयार होते, ही पनवेलकरांसाठी अभिमानाची बाब आहे. पनवेलला वेगळे महत्त्व आहे. याठिकाणची भूमी पुरोगामी आहे. सनातनसारखी प्रतिगामी संस्था याठिकाणी येते आणि पुरोगामी विचारसरणीच्या लोकांची हत्या करण्याचे शिक्षण देते ही दु:खाची बाब असल्याची खंत जयंत पाटील यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)