शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

अडीच कोटींच्या मुद्देमालाचे वाटप

By admin | Updated: January 5, 2017 06:27 IST

पोलिसांनी मागील काही महिन्यांत अनेक गुन्हे उघडकीस आणून त्यामधील करोडोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलीस महासंचालक सतीश माथूर

नवी मुंबई : पोलिसांनी मागील काही महिन्यांत अनेक गुन्हे उघडकीस आणून त्यामधील करोडोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलीस महासंचालक सतीश माथूर यांच्या उपस्थितीमध्ये हा ऐवज संबंधितांकडे सोपवण्यात आला. त्याकरिता वाशीतील भावे नाट्यगृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मागील काही वर्षांत सराईत गुन्हेगारांची धरपकड करून त्यांच्याकडून चोरीचा ऐवज जप्त करून नवी मुंबई पोलिसांनी कार्यक्षमता सिद्ध केली आहे. अशाच गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला सुमारे चार कोटींचा ऐवज नुकताच पनवेल येथील कार्यक्रमात संबंधित तक्रारदारांच्या ताब्यात देण्यात आला होता. त्यानंतर बुधवारी वाशीत झालेल्या कार्यक्रमात दोन कोटी ३४ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल १५४ तक्रारदारांच्या ताब्यात देण्यात आला. महाराष्ट्र पोलीस स्थापनादिनाच्या निमित्ताने नवी मुंबई पोलिसांतर्फे विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्यानुसार मागील काही महिन्यांत उघड झालेल्या गुन्ह्यांमधील जप्त केलेला ऐवज संबंधितांच्या ताब्यात देण्याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस महासंचालक सतीश माथूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी चोरीला गेलेला मुद्देमाल मिळाला म्हणजे आपली जबाबदारी संपली, असे नसल्याचे माथूर यांनी उपस्थितांना सांगितले. गुन्ह्यामध्ये पकडलेल्या आरोपीला शिक्षा झाल्यानंतरच ही प्रक्रिया संपुष्टात येत असून त्यासाठी तक्रारदारांनी न्यायालयात हजर राहून साक्ष देणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. अन्यथा, ऐन वेळी तक्रारदार न्यायालयात गैरहजर राहिल्याने गुन्हेगारांची शिक्षा टळल्याची अनेक प्रकरणे घडत असल्याचेही त्यांनी सांगितले. तर पोलिसांनीही समाजाच्या समाधानासाठी आरोपीला कोठडी होईपर्यंत प्रयत्नशील राहण्याचा सल्ला दिला. नवी मुंबईची जडणघडण होत असताना, आपणही इथे काम केल्याचे त्यांनी सांगितले. त्या वेळी पनवेल व गडचिरोली या ठिकाणी जाण्याला कोणी अधिकारी तयार नसताना आपण पनवेल निवडले. शहरात तेव्हाच्या व सध्याच्या परिस्थतीमध्ये कमालीचा बदल झालेला आहे. मात्र, सध्या प्रत्येकजण नवी मुंबईतच बदली मागत असल्यामुळे, शहरात असे नेमके काय आहे? हे शोधावे लागणार असल्याचेही त्यांनी विनोदी शैलीतून सांगितले.या वेळी घडलेल्या गुन्ह्याची उकल करून तक्रारदारांचा मुद्देमाल परत मिळवून देण्यात पोलिसांपुढे अनेक अडचणी असतात. त्यावर मात करून गुन्हेगारांना अटक केल्यानंतर जप्त केलेला मुद्देमाल संबंधितांकडे सोपवण्याचा हा दिवस पोलिसांकरिता आत्मसंतुष्टीचा दिवस असल्याची भावना पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी व्यक्त केली. गतकाळात सराईत गुन्हेगारांच्या ३ टोळ्यांमधील १७ जणांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली असून, फसवणुकीच्या ९९ तक्रारींमधील ३१ लाख ४६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला असल्याचेही त्यांनी सांगितले. २०१६ मध्ये ६० टक्के गुन्हे सिद्ध झाले असून तपासाचे हे प्रमाण सन २०१५च्या तुलनेत अधिक असल्याचेही त्यांनी सांगितले.गुन्हेगारांची माहिती आॅनलाइनसराईत गुन्हेगारांची माहिती नागरिकांना सहज उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे त्यांच्यापासून सर्वसामान्यांची होणारी फसवणूक टळणार आहे. याकरिता साडेचार हजार गुन्हेगारांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध केल्याचे गुन्हे शाखा उपआयुक्त दिलीप सावंत यांनी सांगितले. तर यापुढे अधिकारी बदलला तरी तपासाच्या कामात अडथळा होणार नाही, अशी यंत्रणा तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.