नवी मुंबई : शिवसेना - भाजपा सरकारला एक वर्ष होवून गेल्यानंतरही कार्यकर्त्यांना अजून चांगले दिवस आलेले नाहीत. एसईओची नियुक्ती करण्यासाठी ८ महिन्यांपूर्वीच अर्ज भरुन घेतले आहेत. परंतू अद्याप एकही नियुक्ती केली नसल्यामुळे कार्यकर्त्यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली आहे.महाराष्ट्रात शिवसेना व भाजपाचे सरकार सत्तेवर येताच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. नवी मुंबईमधील अनेक मोठ्या पदाधिकाऱ्यांना सिडको संचालकासह विविध महामंडळावर वर्णी लागण्याची स्वप्न पडू लागली होती. शाखाप्रमुखांसह अनेक पदाधिकाऱ्यांना किमान एसईओ म्हणून नियुक्ती व्हावी असे वाटू लागले होते. ठाणे व इतर ठिकाणी तत्काळ नियुक्त्या करण्यात आल्या. परंतू नवी मुंबईमधील नियुक्त्या अद्याप झालेल्या नाहीत.केंद्र व राज्यात सत्ता आली तरी शिवसेना कार्यकर्त्यांना अद्याप त्याचा काहीच लाभ झालेला नाही. नागरिकांचे कोणतेच प्रश्न सोडविता येत नाहीत. यामुळे कार्यकर्त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. युतीपेक्षा आघाडी सरकारच चांगले होते अशा प्रतिक्रीया व्यक्त होत आहेत.
युतीच्या कार्यकर्त्यांत सरकारविषयी नाराजी
By admin | Updated: May 1, 2016 02:39 IST