शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सर्व व्यवसाय असंघटित कामगार कल्याण महामंडळाच्या छताखाली, ३४० क्षेत्रांतील कामगारांना राज्य शासनाचे कवच

By नारायण जाधव | Updated: July 10, 2023 16:09 IST

या सर्व ३४० क्षेत्रांतील कामगारांना आता महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळाचे कवच लाभणार आहे.

नवी मुंबई : असंघटित क्षेत्रातील कामगार हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहेत. शेती, उद्योग, फेरीवाले, आयटी इंडस्ट्रिजसह सर्वच क्षेत्रात असंघटित क्षेत्रातील कामगारांचे योगदान मोठे आहे. अशा कामगारांचे ३८ घटकांतील वर्गीकरण एकूण ३४० क्षेत्रांतील कामगारांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यात शेती, उद्योग, फेरीवाले, आयटी इंडस्ट्रिजसह, प्रिंट आणि टीव्ही, डिजिटल क्षेत्रातील पत्रकार, तत्सम कर्मचारी, कॉल सेंटर, मॉल, लॉ फर्म, शिक्षण संस्थांमधील कर्मचारी यांचा समावेश आहे. या सर्व ३४० क्षेत्रांतील कामगारांना आता महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळाचे कवच लाभणार आहे.

केंद्र सरकारने असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा पुरविण्याच्या डिसेंबर २००८ मध्ये असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम मंजूर केला आहे. त्यानुसार लेबर ब्युरो, चंडीगड यांनी २०१४ मध्ये केलेल्या चौथ्या वार्षिक रोजगार-बेरोजगार सर्वेक्षणानुसार महाराष्ट्र राज्यात ३,६५,२५,१४० असंघटित कामगार आहेत. या असंघटित कामगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा नियम २०१३ अन्वये ‘महाराष्ट्र राज्य सामाजिक सुरक्षा मंडळ’ स्थापन केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र सरकारने असंघटित कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यासाठी ई श्रम पोर्टल तयार केले असून त्यावर ३१ मे २०२३ अखेर राज्यात सुमारे १३६.२८ लाख असंघटित कामगारांनी नोंदणी केलेली आहे. हे कामगार कृषी, उद्योग, सेवा अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत.

मिळणार सरकारी योजनांचा लाभराज्यातील असंघटित क्षेत्रातील विविध व्यवसायात काम करणाऱ्या असंघटित कामगारांच्या संघटना तसेच राज्यातील लोकप्रतिनिधींनी सातत्याने असंघटित कामगारांच्या व्यवसायाच्या वर्गीकरणानुसार कामगारांच्या कल्याणाकरिता कल्याण मंडळे स्थापन करण्याबाबत वेळोवेळी मागणी केली आहे. परंतु, अशा प्रकारे वेगवेगळ्या व्यवसायात काम करणाऱ्या असंघटित कामगारांसाठी वेगवेगळी स्वतंत्र कल्याण मंडळे स्थापन करण्याऐवजी सर्वसमावेक्षक एकच महामंडळ स्थापन करून सर्व असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ देता योग्य होईल, असा निष्कर्ष शासनाने काढला आहे.

या ३९ क्षेत्रांतील कामगारांचा समावेशनव्या असंघटित कामगार कल्याण महामंडळाच्या कार्यक्षेत्रात कृषी, पशुपालन, डेअरी, घरकामगार, बिडी उद्योेग, रिक्षा-टॅक्सीचालक, हमाल, बूट पॉलिश, कपडा, पॉवरलूम, पत्रकारितेतील छापील, टीव्ही, डिजिटल माध्यम, हॉटेल उद्योग, बँकिंग क्षेत्र, ब्युटी पार्लर, सिनेमा उद्योग, बांधकाम उद्योग, शिक्षण संस्था, जाहिरात, मॉडेलिंग, लेखक, कवी, सर्व अन्नप्रक्रिया उद्योग, तेंदूपत्ता कामगार, आशा, अंगणवाडी वर्कर, काॅल सेंटर, मॉल, सर्व प्रकारच्या उत्पादन क्षेत्रातील कामगार, दवाखाने, हॉस्पिटल, फार्मा उद्याेग, वकील, ज्योतिष, इंजिनीअर, प्रॉपर्टी डिलरसह इतर व्यावसायिक, थिएटर उद्योग, वाहतूक उद्योग, पर्यटन क्षेत्र आणि स्वयंरोजगार अशा ३४० क्षेत्रांचा समावेश आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई