शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

गुढीपाडव्यासाठी शहरातील विकासकांची लगबग

By admin | Updated: March 27, 2017 06:35 IST

मागील काही वर्षांत घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. बजेटमधील घरांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण

नवी मुंबई : मागील काही वर्षांत घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. बजेटमधील घरांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांची परवड सुरू झाली आहे. यातच गेल्या वर्षी नोटाबंदीचा निर्णय झाल्याने याचा फटका घरखरेदीला बसला आहे. यातच बड्या गुंतवणूकदारांनी हात आखडता घेतल्याने विकासकांचे धाबे दणाणले आहेत. असे असले तरीही गुढीपाडव्याचा मुहूर्त साधण्यासाठी शहरातील बहुतांशी विकासकांनी कंबर कसली आहे.नवी मुंबईत दिवसेंदिवस घरांची मागणी वाढत आहे; परंतु शहरातील जमिनीचे भाव गगनाला भिडल्याने स्वस्त व परवडणारी घरे बांधणे विकासकांना अवघड होऊन बसले आहे. मागणी व पुरवठा यात मोठ्या प्रमाणात तफावत निर्माण झाली आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेऊन या क्षेत्रातील अनिर्बंध व बेहिशोबी व्यवहाराला चाप लावला आहे. त्यामुळे मागील पाच-सहा महिन्यांपासून शहरातील मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प पडले आहेत. मालमत्ता विकल्या न गेल्याने बिल्डर्स आणि गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये अडकून पडले आहेत. गुढीपाडव्याचा मुहूर्त काही प्रमाणात का होईना तारून नेईल, असा विश्वास विकासकांना वाटतो आहे. या पार्श्वभूमीवर अनेक विकासकांनी ग्राहकांअभावी धूळखात पडून असलेल्या आपल्या मालमत्ता विक्रीसाठी काढल्या आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत. काहींनी तर घरखरेदीवर चक्क डिस्काऊंट देऊ केले आहेत, तर अनेकांनी आपल्या नवीन गृहप्रकल्पातील घरखरेदीवर आकर्षक सवलत जाहीर केली आहे. एकूणच घरखरेदीच्या प्रतीक्षेत असलेला ग्राहक बाहेर पडेल, असे विकासकांना वाटत आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडव्याचा दिवस नवीन खरेदीसाठी शुभ मानला जातो. तसेच सध्या वित्तसंस्थांनी गृहकर्जावरील व्याजदरातही कपात केली आहे. त्यामुळे नोटाबंदीचा कोणताही परिणाम गृहखरेदीवर होणार नाही. उलट सध्याची परिस्थिती घरखरेदीला पोषक असल्याने गुढीपाडव्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास विकासकांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)च्येत्या १ एप्रिलपासून रेडीरेकनरच्या दरात दहा टक्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरांच्या किमतीतही वाढ होणार आहे. त्यामुळे घर खरेदीसाठी ग्राहकांना ही शेवटची संधी असणार आहे. विशेष म्हणजे सध्याचे प्रचलित दर सुध्दा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे आहेत. भविष्यात ते कमी होण्याची शक्यता धुसर आहे. सर्वसामान्य ग्राहकांना ही वस्तुस्थिती पटल्याने गृहखरेदीला चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास विकासकांना वाटतो आहे.रहजारो मालमत्ता खरेदीविना पडूनअगोदरच मंदीतून जाणाऱ्या रियल इस्टेट क्षेत्राला नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका बसला आहे. शहराच्या विविध परिसरांत आजमितीस विविध आकाराच्या जवळपास २५ ते ३० हजार सदनिका विक्रीविना पडून आहेत. या सदनिका विकल्या जात नसल्याने विकासकांनी नवीन प्रकल्पांच्या कामाचीही गती कमी केली आहे. सध्या उपलब्ध सदनिका विकण्यावर बहुतांशी विकासकांनी भर दिला आहे.