पनवेल : पनवेल तालुक्यातील वावंजे गावातील आकाश नामदेव शेळके या युवकाच्या डोक्यावर लोखंडी पाइपने हल्ला चढवत त्याला दोघांनी जखमी केले असून, तालुका पोलिसांनी यातील एकाला अटक केली आहे, तर दुस-या आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दोन्ही आरोपींवर अॅट्रोसिटी व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वावंजे गावातील आकाश नामदेव शेळके या युवकाला क्षुल्लक कारणावरून रूपेश शेंडे व मेघनाथ पाटील या दोघांनी जातीवाचक शिवीगाळ करून त्याच्यावर लोखंडी पाइपने डोक्यावर हल्ला केला. या हल्ल्यात आकाश नामदेव शेळके हा गंभीर जखमी झालेला असून त्याच्यावर एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. तालुका पोलीसस्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला असून आरोपी रूपेश शेंडेला अटक करण्यात आली आहे. दुसरा आरोपी मेघनाथ पाटील हा फरार आहे.
आकाश नामदेव शेळके या युवकावर हल्ला केल्यानं दोघांवर अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 02:47 IST