शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

ऐरोली-काटई प्रवास होणार अवघ्या 10 मिनिटांत पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2020 07:57 IST

उन्नत मार्ग ; खासदार श्रीकांत शिंदे यांनी घेतला कामाचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : ऐरोली ते काटई नाका उन्नत मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर ऐरोली ते काटई हा प्रवास अवघ्या दहा मिनिटांचा होणार आहे, अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. कल्याण-शीळ मार्गावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असल्याचे ते पुढे म्हणाले.ऐरोली ते काटई नाका उन्नत मार्गाच्या कामाचा आढावा गुरुवारी डॉ. शिंदे यांनी घेतला. या वेळी एमएमआरडीएचे अधिकारी उपस्थित होते. उन्नत मार्गातील पहिला टप्पा सप्टेंबर २०२१ पर्यंत पूर्ण होणार आहे. नियोजित वेळेआधीच उन्नत मार्गाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना या वेळी शिंदे यांनी दिल्या.ऐरोली ते मुंब्रा वाय जंक्शन या टप्प्यातील सहा मार्गिका व बोगद्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ही कामे झाल्यानंतर प्रवास अत्यंत वेगवान होणार असून, इंधन व वेळेची बचत होणार आहे. शिवाय वाहतूककोंडीचा सामना वाहनचालकांसह प्रवाशांना करावा लागणार नाही. या मार्गाचा सर्वाधिक फायदा कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूरकरांना होणार आहे. या प्रकल्पाच्या टप्पा क्रमांक दोनसाठी नगरविकास विभागाकडे अंतिम मान्यतेकरिता प्रस्ताव सादर केला आहे. त्यास मान्यता मिळाल्यावर सर्व प्रकारच्या परवानग्या घेऊन प्रकल्पासाठी आवश्यक असलेली जमीन संपादित करण्याची प्रक्रियाही लवकर सुरू करण्यात येणार आहे. बाधितांचे पुनर्वसन ठाणे मनपा व एमएमआरडीएतर्फे केले जाईल, असे शिंदे यांनी सांगितले.

असा असेल रस्ताn ऐरोली ते काटई नाका रस्ता हा १२.३ किमी लांबीचा आहे. कामाचे तीन टप्प्यांत विभाजन केले आहे. त्यात पहिला टप्पा ठाणे-बेलापूर, दुसरा ऐरोली पूल ते ठाणे आणि तिसरा काटई नाका असा आहे.n प्रकल्पाचा पहिला भाग हा अंशत: उन्नत व पारसिक डोंगरातून जाणार आहे. या प्रकल्पाची किंमत ३८२ कोटी आहे. बोगद्याची लांबी साडेतीन किलोमीटर आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील सगळ्या बोगद्यांपेक्षा जास्त लांबीचा हा बोगदा आहे. त्यात तीन अधिक एक मार्गिका राहणार आहेत.n बोगद्याच्या बांधकामादरम्यान प्रथमत: सात मीटर रुंद पायलट खोदकाम करण्यात येणार आहे. बोगद्यासाठी पंखे लावून व्हेंटिलेटशन तसेच विद्युतीकरणही करण्यात येणार आहे.