शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

ऐरोली खाडीकिनारी जैविक कचरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 01:58 IST

मच्छीमारांच्या जीवाला धोका : शहराच्या विद्रूपीकरणात पडतेय भर

अनंत पाटीललोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : प्लास्टिकच्या पिशव्या, केरकचरा, बांधकामाचे टाकाऊ साहित्य तसेच विविध आजारांवर उपचारासाठी रुग्णालये आणि दवाखान्यात वापरण्यात आलेले वैद्यकीय जैविक टाकाऊ साहित्य  ऐरोली खाडीकिनारी निदर्शनास येत आहे. त्यामुळे ऐरोली आणि दिवा कोळीवाड्यातील मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशी करण्याची मागणी कोळीवाड्यातील मच्छीमारांकडून होत आहे. ऐरोली - पटनी नॉलेज सिटी खाडीकिनारी मार्गावर ऐरोली सेक्टर १९ येथील खाडीकिनारी निर्जन ठिकाणी रुग्णालये आणि दवाखान्यांत वापरण्यात आलेला आणि काही मुदत संपलेला टाकाऊ जैविक कचरा  पडलेला आहे. ऐरोली आणि दिवा कोळीवाड्यातील अनेक मच्छीमार याच खाडीत मासेमारीसाठी रात्रंदिवस जात असतात.  रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन हा कचरा टाकला गेल्याचा संशय मच्छीमारांनी व्यक्त केला आहे. यामुळे ऐरोली आणि दिवा कोळीवाड्यातील मच्छीमारांवर जीवघेण्या आजारांना सामोरे जाण्याची वेळ येऊ नये, अशी मागणी या कोळीवाड्यातील ग्रामस्थांनी केली आहे.

घटनास्थळी त्वरित पाहणी केली जाईल. कचरा, डेब्रिज, माती किंवा जैविक कचरा कुठेही टाकू नये याविषयी मार्गदर्शन फलक लावण्यात आलेले आहेत. असे असूनही खाडीकिनारी  कुठेही जैविक कचरा टाकल्याचे निदर्शनास आल्यास किंवा आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. - एन. जी. कोकरे, वनपरिक्षेत्र अधिकारी, ऐरोली

ऐरोली खाडीकिनारी दिवाबत्तीची सोय नसल्यामुळे रात्री मासेमारीसाठी जाताना  अंधाराच्या साम्राज्यातून जावे लागत आहे. अनेकदा येथून जाताना औषधे आणि इंजेक्शनच्या सुयांवर पाय पडून अनेकांना जखमा होतात. संबंधित विभागाने कचरा टाकणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना पोलिसांच्या ताब्यात देणे आवश्यक आहे.  - धनाजी पाटील, अध्यक्ष, ऐरोली कोळीवाडा मच्छीमार सेवा संस्था 

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई