शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

उरण-पनवेलमध्ये वायू प्रदूषण

By admin | Updated: March 20, 2017 02:15 IST

उरण-पनवेल परिसरातील रस्त्यांच्या कडेला तसेच डोंगर कपारीत असलेल्या अनेक क्रशर आणि क्वारीतून निघणाऱ्या प्रचंड मातीच्या

मधुकर ठाकूर / उरणउरण-पनवेल परिसरातील रस्त्यांच्या कडेला तसेच डोंगर कपारीत असलेल्या अनेक क्रशर आणि क्वारीतून निघणाऱ्या प्रचंड मातीच्या धुरळ्यामुळे परिसरातील हवेत मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले आहे. २४ तास धुरळा फे क णाऱ्या या क्रशर आणि क्वाऱ्यांमुळे रस्त्यांवरून ये-जा करणाऱ्या हजारो वाटसरूंना तोंडावर कपडा बांधूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. ज्यांच्याकडून प्रदूषण नियंत्रणात आणण्याची अपेक्षा आहे तेच या प्रदूषणास हातभार लावत आहेत. उरण-पनवेल परिसरात विविध रस्त्यांच्या कडेला आणि डोंगर कपारीत एकूण ९८ क्वाऱ्या आहेत. यामध्ये उरण परिसरातील ११ तर पनवेल तालुक्यातील खडी, ग्रीट तयार करण्याचे काम मोठ्या प्रमाणात केले जाते. क्रशरमध्ये खडी, ग्रीट तयार करताना स्प्रिनिंग अरेंजमेंट, डस्ट सेपरेशन सिस्टीम, बोल्ट क व्हर अशा काही उपाययोजना करण्याची आवश्यकता असते. तशा सूचना, नियम, अटीही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून परवानगी देताना स्पष्टपणे दिलेल्या असतात. मात्र अशा सूचना, अटी, नियम क्रशरचालकांकडून पायदळी तुडविल्या जात आहेत.उरण-पनवेल परिसरात २४ तास धडधडणाऱ्या क्रशरमुळे दगड, मातीचा धुरळा रस्ते, आकाशातील आसमंत अगदी व्यापून टाकतो. यामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे. तसेच उरण-पनवेल मार्गावर दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते. क्रशरचा मातीचा धुरळा रस्त्यावर प्रचंड प्रमाणात पसरत असल्याने वाहन चालकांना समोरचे दिसण्यास अनेक अडचणी येतात. धुरळाही वाहन चालकांच्या नाका- तोंडात जात असल्याने त्यांच्यावर गुदमरण्याचीही पाळी येते. त्यामुळे वाहन चालकांचे लक्ष विचलित होत असल्याने अपघात घडत आहेत. तसेच अनेकांना दमा, श्वसनाचे विविध आजारही जडल्याचे सांगितले जाते. उरण-पनवेल परिसरात अनेक क्वाऱ्याही आहेत. अशा क्वाऱ्यांनाही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत परवानगी दिली जाते. दगड, मातीचे उत्खनन करण्यासाठी अशा मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंगही केले जाते. यामुळेही हवेत धुरळा उडून वायू प्रदूषण होते. उरण-पनवेलमध्ये सुरू असलेल्या व हवेत प्रचंड प्रमाणात फैलावणाऱ्या आणि विनाशकारी क्रशरवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची आहे. मात्र त्यांच्याकडून या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.हवा प्रदूषित होत असल्याची अधिकाऱ्यांची कबुलीचिरनेर परिसरात काही क्रशर अनधिकृत आहेत. नव्याने नियुक्ती झाली असल्याने काही अधिकारी विभागालाच अंधारात ठेवू पाहत आहेत. अशा अनधिकृत क्रशरची पाहणी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा दावाही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ उरण विभागाचे उप प्रादेशिक अधिकारी एस.एच. पडवळ यांनी केला. काही अधिकाऱ्यांना समक्ष विचारणा केली असता, चिरनेर परिसराकडे मागील दोन वर्षांपासून फिरकलेही नसल्याची धक्कादायक कबुलीही अधिकाऱ्याने दिली. तर पनवेल प्रदूषण मंडळ विभागाच्या अखत्यारीत ४७ क्रशर आहेत. अधिकृत असलेल्या क्रशरमधून मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण होत असल्याची बाब पनवेल विभागाचे उप प्रादेशिक अधिकारी जयवंत हजारे यांनी मान्य केली. पनवेल परिसरात अनधिकृत क्रशर आहेत की नाही याबाबत आपणाकडे माहिती उपलब्ध नसल्याची कबुलीही हजारे यांनी दिली.