शहरं
Join us  
Trending Stories
1
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
2
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
3
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
4
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
5
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
6
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
7
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
9
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
10
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
11
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
12
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
13
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
14
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
15
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
16
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
17
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
18
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
19
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
20
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह

Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 09:06 IST

हजारोंच्या उपस्थितीत मंगळवारी साश्रुनयनांनी एअर होस्टेस मैथिली पाटील हिला अखेरचा निरोप देण्यात आला.

उरण: कुटुंबीयांचे काळीज पिळवटून टाकणारे हुंदके, हंबरडे, आक्रोश आणि हळहळ व्यक्त करून हजारोंच्या उपस्थितीत मंगळवारी साश्रुनयनांनी एअर होस्टेस मैथिली पाटील हिला अखेरचा निरोप देण्यात आला. तिच्या पार्थिवावर न्हावा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

१२ जूनला दुपारी अहमदाबादहून लंडनकरिता उड्डाण केलेल्या विमानाला अपघात झाला. त्यात न्हावा गावातील २३ वर्षीय मैथिली कार्यरत होती. तिने बुधवार, ११ जूनला कुटुंबासोबत वेळ घालविला होता. गुरुवार, १२ जूनला ती सकाळीच उड्डाणासाठी लंडनकडे रवाना होणाऱ्या विमानात ड्युटीकरिता कुटुंबीयांचा निरोप घेऊन निघाली होती. विमानात चढण्यापूर्वी तिने सकाळी ११.३० सुमारास कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधला होता. मात्र, काही वेळाने विमानाला अपघात झाल्याचे कुटुंबीयांना समजले. तिचा मृत्यू झाल्याच्या बातमीवर मात्र कुटुंबीय विश्वास ठेवण्यास कोणत्याही प्रकारे तयार नव्हते.

अपघाताची बातमी येताच मैथिलीची आई, मामा आणि एक-दोन नातेवाइकांनी गुरुवारीच थेट अहमदाबाद गाठले. तेथील विविध रुग्णालयांमध्ये, तर अपघाताहून अधिक भयानक दृश्य दिसत होते. अनेक नातेवाईक आपल्या मृत्युमुखी पडलेल्या माणसांचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी रुग्णालयांमध्ये जागा मिळेल तिथे वाट पाहत बसून होते. नातेवाइकांना ओळखण्यासाठी डीएनए चाचणी केली जात होती. चाचणीचे निष्कर्ष येण्यासाठी ७२ तासांचा वेळ लागत होता. मात्र, ७२ तासांची प्रतीक्षा म्हणजे एकप्रकारे दिव्यच होते, असे कुटुंबीयांनी सांगितले. 

पोलीस, नेत्यांची उपस्थिती१६ जूनला सायंकाळी ५.३० वाजता मैथिलीचा मृतदेह ताब्यात मिळाला. त्यानंतर विमानाने मुंबई गाठल्यानंतर मंगळवारी सकाळी १०.३०च्या सुमारास न्हावा येथील घरी आणला असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. मैथिलीचा मृतदेह घरी आणताच कुटुंबीयांचा अश्रूचा बांध फुटला आणि भावनांना वाट करून दिली. पोलिस, प्रशासन अधिकारी, नेते व नागरिकांच्या उपस्थितीत मैथिलीच्या पार्थिवावर न्हावा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाNavi Mumbaiनवी मुंबईMaharashtraमहाराष्ट्र