शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स २४५० कोटी खर्चुन करणार सीएसएमटी स्थानकाचा पुनर्विकास

By नारायण जाधव | Updated: May 4, 2023 20:49 IST

त्यात २००० कोटींचा खर्च नमूद केला होता.

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : अग्रगण्य अभियांत्रिकी आणि बांधकाम कंत्राटदार अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्सने मुंबईच्या प्रतिष्ठित छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनच्या पुनर्विकासाची ऑर्डर जिंकली आहे. रेल लँड डेव्हलपमेंट अथॉरिटीने त्यांची सर्वात कमी दराची २४५० कोटींची निविदा मंजूर केली आहे. हा पुनर्विकास प्रकल्प ३० महिन्यांत पूर्ण करायचा आहे. रेल लँड डेव्हलपमेंट अथॉरिटीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनच्या पुनर्विकासासाठी ऑक्टोबर २०२२मध्ये निविदा मागविल्या हाेत्या. त्यात २००० कोटींचा खर्च नमूद केला होता.

स्पर्धेत होत्या चार कंपन्या

लार्सन ॲन्ड टुर्बो, ॲफकॉन्स कन्स्ट्रक्शनस आणि नागार्जुन कन्स्ट्रक्शनस कंपनी शर्यतीत होते. १५ मार्च २०२३ रोजी तांत्रिक बोली उघडल्यानंतर १२ एप्रिल २०२३ रोजी आर्थिक बोली उघडण्यात आल्या. त्यात अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्सची निविदा सर्वात कमी दराची होती.हेरिटेज आराखड्यात बदल नाहीत. स्थानकाच्या गॉथिक शैलीतील हेरिटेज इमारतीत कोणतेही मोठे बदल केले जाणार नाहीत, याची काळजी कंत्राटदार कंपनीने घ्यायची आहे. कारण हे स्थानक युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत आहे.

या असतील सुविधा

पुनर्विकास कामाच्या व्याप्तीमध्ये स्थानक इमारती आणि संबंधित पायाभूत सुविधांसाठी नागरी कामे करण्यात येणार आहेत. यात प्रामुख्याने एक प्रतिष्ठित दर्शनी भाग, अति-आधुनिक स्टेशन इमारती, हेरिटेज इमारतींचे नूतनीकरण, उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी स्वतंत्र प्लॅटफॉर्म आणि कनेक्शन यांचा समावेश आहे. तसेच महात्मा ज्योतिबा फुले मंडई पासून स्कायवॉकद्वारे जोडण्यात येणार आहे. पुनर्विकसित सीएसएमटी स्थानकात सर्व प्रवासी सुविधांसह रिटेल, कॅफेटेरिया आणि मनोरंजनाच्या सुविधांसह एक प्रशस्त छताचा प्लाझा बांधण्यात येणार आहे. यात फूड कोर्ट, वेटिंग लाउंज, स्थानिक उत्पादने विकण्यासाठी दुकाने असणार आहेत. स्थानकात पुरेशी रोषणाई, मार्ग शोधक/चिन्हे, लिफ्ट्स/एस्केलेटरसह वाहनतळाच्या पुरेशा सुविधांसह वाहतूक सुरळीत होण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात येणार आहे.

टॅग्स :CSMTछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस