शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
4
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
5
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
6
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
7
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
8
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
9
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
10
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
11
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
12
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
13
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
14
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
15
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
16
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
17
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
18
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
19
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
20
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

नवी मुंबईत सकल मराठा समाजाची निदर्शने

By नामदेव मोरे | Updated: February 16, 2024 19:58 IST

अधिवेशनात सगेसोयऱ्यांच्या अद्यादेशाचे कायद्यात रूपांतर करावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

नामदेव मोरे/ नवी मुंबई : सकल मराठा समाज व मराठा उद्योजक लॉबीच्या माध्यमातून वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करण्यात आली. मनोज जरांगे पाटील यांच्या उपाेषणाची योग्य दखल घेतली नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. अधिवेशनात सगेसोयऱ्यांच्या अद्यादेशाचे कायद्यात रूपांतर करावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

शासनाने सगेसोयऱ्यांना कुणबी दाखले देण्याविषयी दिलेल्या अद्यादेशाचे व इतर अश्वासनांची पुर्तता करावी या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. त्यांची प्रकृती खालावल्यामुळे राज्यातील समल मराठा समाजामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. सरकारने आंदोलनाची योग्य दखल घेतली नाही. यामुळे नाराज झालेल्या सकल मराठा समाज व मराठा उद्योजक लॉबीच्या पदाधिकाऱ्यांनी सायंकाळी वाशीतील शिवाजी चौकात निदर्शने केली.

सरकारविरोधात घोषणाबाजी केली. सरकारने चालढकल करू नये. मराठा समाजाला कुणबी दाखले असणाऱ्यांच्या सगेसोयऱ्यांनाही दाखले मिळावे यासाठी काढलेल्या अद्यादेशाचे लवकर कायद्यात रूपांतर करावे. विशेष अधिवेशनात कायदा तयार करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. शासनाने दुर्लक्ष सुरूच ठेवल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणNavi Mumbaiनवी मुंबई