शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बारणेंच्या विजयानंतर आमदार प्रशांत ठाकूर यांचा मार्ग मोकळा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 01:01 IST

विधानसभेची सेमीफायनल; राजकीय गणितांची जुळवाजुळव सुरू; शहरी मतदारांमुळे मताधिक्य वाढले

- वैभव गायकर, पनवेलमावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे हे विक्रमी दोन लाखांच्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. हा त्यांचा या मतदारसंघातील दुसरा विजय आहे. मात्र, या वेळी मतांमध्ये मिळालेली आघाडी विक्रमी असल्याने युतीला येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत चांगले दिवस येतील, असे मानले जात आहेत. लोकसभा मतदारसंघातील पनवेल या सर्वात मोठ्या विधानसभा क्षेत्रातील बारणेंना सुमारे ५४ हजारांचे मताधिक्य मिळाले असल्याने या मताधिक्याच्या आधारे विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर यांचा मार्ग मोकळा झाला असल्याचे बोलले जात आहे.

लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणुकीची सेमी फायनल असल्याने दोन्ही पक्षांनी प्रचारात जोर धरला होता. पनवेलमध्ये सेनेच्या जोडीला भाजप, तर राष्ट्रवादीच्या जोडीला शेकाप ठामपणे उभे होते. लोकसभेच्या आडून भविष्यातील विधानसभा निवडणुकीची चाचपणी भाजप व शेकाप करीत होते. मात्र, मावळमधील निकाल राष्ट्रवादीसह शेकापला धक्कादायक आहे. पनवेलमध्ये श्रीरंग बारणे यांच्यापेक्षा पार्थ पवार यांनी प्रचारात आघाडी घेतली होती. मात्र, निकाल पाहता, पनवेलमध्ये प्रचंड प्रमाणात मोदी लाटेचा फटका पार्थ पवार यांना बसला आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांचा १४ हजार मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत सेनेच्या उमेदवारालाही १८ हजार मते मिळाली होती.विधानसभा निवडणूकदेखील या वर्षीच पार पडणार आहे. बारणेचे पनवेलमधील मताधिक्य पाहता, प्रशांत ठाकूर यांना विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा होणार हे निश्चित. पनवेलमध्ये शेकापच्या मार्फत पनवेल महापालिकेतील विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांना विधानसभेच्या निवडणुकीत उतरविण्याची तयारी सुरू आहे. मात्र, राजकीय गणिते पाहता, शेकापचा विधानसभा निवडणुकीत चांगलाच कस लागण्याची शक्यता आहे.

पनवेलमध्ये शेकापचा वरचष्मा राहिला आहे. मात्र, कालांतराने शहरी मतदारांमध्ये वाढ झाल्याने त्याचा फटका हळूहळू शेकापला विविध ठिकाणी बसला आहे. सध्याच्या घडीला महापालिकेत भाजप सत्ताधारी आहे, तर शेकाप मित्रपक्ष विरोधी पक्षात बसले आहेत. विधानसभेत विजय संपादित करण्यासाठी शेकापला मोठ्या प्रमाणात संघटनात्मक पातळीत काम करावे लागणार आहे. विशेषत: शहरी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना अधिक परिश्रम घ्यावे लागणार आहेत. लोकसभा निवडणूक विधानसभेची सेमी फायलन पाहिली जात असताना सेनेच्या उमेदवाराला पनवेलमधून मिळालेली ५४ हजारांची लीड पाहता विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर यांना येऊ घातलेल्या विधानसभेसाठी होणार, असे राजकीय विश्लेषक मत व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :maval-pcमावळ