शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत झोपडपट्टी कारवाईनंतरही हटेना

By admin | Updated: January 26, 2017 03:35 IST

अनधिकृत झोपड्यांवर कारवाई करण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. एपीएमसी येथील मोकळ्या भूखंडावरील अनधिकृत झोपडपट्टी

नवी मुंबई : अनधिकृत झोपड्यांवर कारवाई करण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. एपीएमसी येथील मोकळ्या भूखंडावरील अनधिकृत झोपडपट्टी हटवल्यानंतरही पुन्हा त्याठिकाणी झोपड्यांचे साम्राज्य उभे राहिले आहे. परंतु त्याठिकाणी गुन्हेगारांचे वास्तव्य होत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढत आहे.एपीएमसी सेक्टर १९ येथील मोकळ्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपड्या उभारण्यात आलेल्या आहेत. हा भूखंड सिडकोच्या ताब्यात असून गत महिन्यातच त्याठिकाणच्या झोपड्यांवर कारवाई करण्यात आली होती. मात्र या कारवाईनंतरही पुन्हा त्या भूखंडावर झोपड्यांचे साम्राज्य उभे राहू लागले आहे. यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढणार आहे. सदर झोपडपट्टीमध्ये वास्तव्य असणारी एक महिला गांजा तसेच इतर अमली पदार्थांची विक्री करायची. याप्रकरणी तिच्यावर पोलिसांनी कारवाई देखील केलेली आहे. त्यानंतर पुन्हा नव्याने निर्माण होत असलेल्या त्याठिकाणच्या झोपडपट्टीत सदर महिलेकडून अमली पदार्थ विक्रीचा अड्डा चालवला जाण्याची शक्यता आहे. सिडकोसह पालिका प्रशासनाकडून अनधिकृत झोपड्या हटवण्याच्या कामावर लाखोचा खर्च केला जात आहे. परंतु कारवाई करून मोकळ्या केलेल्या भूखंडाला कुंपण घालून पुन्हा त्यावर अतिक्रमण होवू नये याची खबरदारी घेतली जात नाही. त्यामुळे एकाच भूखंडावर सातत्याने उभारल्या जाणाऱ्या अनधिकृत झोपड्यांवर वारंवार कारवाई करण्याची गरज भासत आहे. (प्रतिनिधी)