शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

दोन तासांच्या शस्त्रक्रियेनंतर सात फुटी जखमी अजगराचा जीव वाचवण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2022 16:05 IST

भक्षाच्या शोधात आलेला आणि जाळ्यात  अडकून जखमी अवस्थेतील सात फुटी अजगरावर पुणे येथील रेस्क्यु इस्पीतळात यशस्वीपणे शस्त्रक्रिया

मधुकर ठाकूर 

उरण :  भक्षाच्या शोधात आलेला आणि जाळ्यात  अडकून जखमी अवस्थेतील सात फुटी अजगरावर पुणे येथील रेस्क्यु इस्पीतळात यशस्वीपणेशस्त्रक्रिया करून त्याला वाचविण्यात यश आले असल्याची माहिती उरण वनक्षेत्रपाल नथुराम कोकरे यांनी दिली.उरण तालुक्यातील चिरनेर येथील एका शेतकऱ्याच्या शेत तळ्यावर पायथॉन जातीचा अजगर भक्षाच्या शोधार्थ आला होता.सात फुटी अजगर संरक्षणासाठी लावण्यात आलेल्या जाळ्यात अडकून पडला होता. जाळ्यातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात तो जखमी झाला होता.याची माहिती मिळताच फ्रेंड्स ऑफ नेचरचे अध्यक्ष जयवंत ठाकूर,  सृष्टी ठाकूर ,  गौरव वशेणीकर यांनी शेतावर जाऊन पाहणी केली.

सर्पमित्रांना सात फुटी लांबीचा अजगर जाळ्यात अडकून गंभीररीत्या जखमी अवस्थेत आढळून आला.त्यांनी सुरी, चाकूने जाळे कापून या जखमी अवस्थेतील अजगराला जाळ्यातून बाहेर काढले. अजराला नायलॉनच्या धाग्यामुळे मोठं मोठ्या जखमा झाल्या होत्या.शस्त्रक्रियेशिवाय जखमी अजगराचा जीव वाचणे अवघड असल्याचे स्पष्ट झाल्याने या घटनेची माहिती सर्पमित्रांनी तत्काळ उरण वनविभागाला दिली.त्यानंतर वनखात्याचे भाऊसाहेब डिविलकर, वनरक्षक संतोष इंगोले,राजेंद्र पवार यांनी या जखमी अजगराला उपचाराच्या व संवर्धनाच्या दृष्टीने ताब्यात घेतले.  उपचारासाठी पुणे येथील रेस्क्यूअर्सच्या उपचार केंद्रात दाखल करण्यात आले होते.शनिवारी अजगरावर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात आली. दोन तासांच्या शस्त्रक्रियेनंतर अजगराचा जीव वाचवण्यात यश आले असल्याची माहिती उरण वनक्षेत्रपाल नथुराम कोकरे यांनी दिली.