शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सर्पमित्राची कमाल! सापाच्या ८१ अंड्यांची २४ दिवस काळजी घेऊन पिलांना दिले जीवदान

By नामदेव मोरे | Updated: April 22, 2024 18:09 IST

प्रजननानंतर सर्व ८१ दिवड जातीच्या सापाच्या पिलांना सुखरूपपणे खाडीकिनाऱ्यावरील जंगलात सोडण्यात आले आहे.

नवी मुंबई : उलवे येथील बांधकाम साईटवर २९ मार्चला सापाची ८१ अंडी सापडली होती. सर्पमित्र अक्षय डांगे यांनी सर्व अंडी सुखरूप ठिकाणी ठेवून २४ दिवस त्यांची काळजी घेतली. प्रजननानंतर सर्व ८१ दिवड जातीच्या सापाच्या पिलांना सुखरूपपणे खाडीकिनाऱ्यावरील जंगलात सोडण्यात आले आहे.

इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी मजुरांना दिवड जातीचा साप दिसला. बांधकामासाठी सुरू असलेल्या हालचालीमुळे तो तेथून निघून केला. त्या ठिकाणी त्याची अंडी दिसली. काही दक्ष नागरिकांनी सर्पमित्र अक्षय डांगे यांना याविषयी माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता अंडी अत्यंत नाजूक होती. त्यांना व्यवस्थितपणे ताब्यात घेऊन एका डब्यात ती उबविण्याची प्रक्रिया सुरू केली. नैसर्गिकपणे ६० दिवसांमध्ये साप अंड्यातून बाहेर येतात. पण अंडी ठेवून किती दिवस झाले याची माहिती नसल्यामुळे त्यांच्यावर नियमित लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. २४ दिवसांनंतर सर्व ८१ अंड्यांमधून साप सुखरूप बाहेर आले. सर्वच्या सर्व पिल्ले सुखरूप असल्यामुळे सर्पमित्रांनीही समाधान व्यक्त केले. दिवड जातीच्या बिनविषारी जातीच्या सापाची ही पिल्ले खाडीकिनाऱ्यावरील जंगलात सुखरूपपणे सोडून दिली आहेत.

अशी उबविली अंडी

सापाची सापडलेली ८१ अंडी उबविण्यासाठी एक डब्यामध्ये ठेवली. त्यामध्ये कोकोपीट टाकून डब्यात ऑक्सिजन जाण्यासाठी काही ठिकाणी छिद्र केली. २४ दिवस सातत्याने ३० डिग्री तापमान राहिल याची काळजी घेतली. योग्य तापमान राखल्यामुळे सर्व अंड्यातून साप सुखरूप बाहेर येऊ शकले.

बांधकामाच्या ठिकाणी सापडलेली अंडी सुखरूप घरी नेऊन ती योग्य तापमानात उबविण्याची प्रक्रिया पार पाडली. सर्व ८१ अंड्यांतून दिवड सापाची पिले सुखरूपपणे बाहेर आल्याचे समाधान आहे. सर्व पिलांना सुरक्षित अधिवासात सोडले आहे.अक्षय डांगे, सर्पमित्र

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईsnakeसाप