शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीनंतर खारघर शहरात वाढले सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2020 00:52 IST

गर्दीचा फटका

वैभव गायकरपनवेल: मुंबई, ठाणे, नवी मुंबई आदींसह पनवेल पालिका मोठी लोकसंख्या असलेली महानगरपालिका आहे. कोविडचा वाढता धोका लक्षात घेता नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या पालिका हद्दीतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मात्र दिवाळी नंतरदेखील पालिका क्षेत्रात काही ठिकाणी मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण वाढले आहेत. यामध्ये खारघर शहर आघाडीवर आहे. 

खारघर शहराची लोकसंख्या मोठी आहे. शहरात मोठ्या संख्येने हॉटेल्स आहेत. मोठी मोठी दुकाने असल्याने होणाऱ्या गर्दीमुळे  रुग्णसंख्या वाढते आहे. विशेष म्हणजे अनलॉक नंतर नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्याने खारघरमध्ये परिस्थिती  गंभीर झाली आहे. सध्या पालिका क्षेत्रात एकूण २४ हजार ९६९ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे.  यामध्ये ५७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २३ हजार ८४९ नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. तर, ५४५ रुग्ण उपचार घेत आहेत. कोविडची दुसरी लाट येण्यापूर्वीच पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी नागरिकांना सतर्कतेचे अवाहन करीत शासन नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत.

सात जणांचा मृत्यू पनवेल महापालिका क्षेत्रात दिवाळी सणानंतर १६ ते २० नोव्हेंबरदरम्यान सात नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये तळोजा येथील तीन, खारघरमधील दोन व पनवेल आणि कामोठे शहारातील प्रत्येकी एका नागरिकाचा समावेश आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

खारघर शहराची लोकसंख्या मोठी आहे. तसेच नागरिकांच्या हलगर्जीपणामुळेच दिवाळीनंतर कोविड रुग्ण वाढले आहेत. कोरोनाची दुसरी लाट लक्षात घेता पालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी.   - डॉ. आनंद गोसावी, वैद्यकीय अधिकारी, पनवेल महानगरपालिका

खारघर शहराची लोकसंख्या मोठी आहे. तसेच नागरिकांच्या हलगर्जीपणामुळेच दिवाळीनंतर कोविड रुग्ण वाढले आहेत. कोरोनाची दुसरी लाट लक्षात घेता पालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी.   - डॉ. आनंद गोसावी, वैद्यकीय अधिकारी, पनवेल महानगरपालिका

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई