शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पावसानंतरही ‘फिफा’चे चारही सामने झाले यशस्वी , तज्ज्ञांची दिवसरात्र मेहनत : शेवटच्या साखळी सामन्यांसाठीही तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 02:26 IST

पाऊस पडत असतानाही डॉ. डी. वाय. पाटील मैदानावरील आतापर्यंतचे चारही साखळी सामने यशस्वीपणे पार पाडण्यात यश आले आहे.

नामदेव मोरे नवी मुंबई : पाऊस पडत असतानाही डॉ. डी. वाय. पाटील मैदानावरील आतापर्यंतचे चारही साखळी सामने यशस्वीपणे पार पाडण्यात यश आले आहे. पावसाचे पाणी तत्काळ वाहून नेण्यासाठी अत्याधुनिक तंत्राचा वापर केल्यामुळे व तज्ज्ञांची समिती दिवसरात्री मेहनत घेत असल्यामुळे हे शक्य झाले आहे. गुरुवारी शेवटचे साखळी सामने होणार असून, तेही यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी जय्यत तयारी केली आहे.नेरुळमधील डॉ. डी. वाय. पाटील मैदानावर ६ आॅक्टोबरला ‘फिफा’ विश्वचषक स्पर्धेचा पहिला सामना झाला. ५ वाजता सामन्यासाठी टॉस उडविण्यात येत असतानाच विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. मॅचेस होणार का? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. ‘फिफा’च्या व्यवस्थापनासह देशभरातील क्रीडा संघटना व क्रीडाप्रेमींनी मॅचेस होणार का? याविषयी विचारणा करण्यास सुरुवात झाली; परंतु पंधरा मिनिटांत पाऊस कमी झाला व पुढील पंधरा मिनिटांत सामने खेळता येतील एवढे मैदान कोरडे झाले व दोन्हीही सामने विनाअडथळा पार पडले. यामुळे सर्वच यंत्रणांनी डॉ. डी. वाय. पाटील मैदान व्यवस्थापनाचेही कौतुक केले. मैदान बनविण्यासाठी वापरण्यात आलेल्या अत्याधुनिक तंत्रामुळे हे शक्य झाले आहे. मैदान तयार करण्यात आल्यापासून अत्याधुनिक तंत्राचा वापर करून स्टेडिअमची निगा राखली जात आहे. मुसळधार पाऊस पडल्यानंतर पुढील दोन तासांमध्ये फुटबॉलसह क्रिकेट सामने घेता येतील, अशी मैदानाची रचना करण्यात आली आहे. अत्याधुनिक तंत्रामुळेच पावसामुळे खेळ थांबविण्याची वेळ आली नाही.‘फिफा’ विश्वचषकातील शेवटचे दोन साखळी सामने गुरुवारी डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिअमवर होत आहेत. टर्की विरुद्ध पेराग्वे व अमेरिका विरुद्ध कोलंबीया यांच्यामध्ये हे सामने होणार आहेत.विश्वचषक स्पर्धेतील पहिला गोल याच मैदानावर झाला आहे. प्रत्येक सामन्याला २५ हजारपेक्षा जास्त क्रीडा रसिकांनी हजेरी लावली आहे. शेवटच्या साखळी सामना पाहण्यासाठीही जास्तीत जास्त क्रीडा प्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन स्टेडिअम व्यवस्थापनानेही केले आहे.

टॅग्स :2017 FIFA U-17 World Cupफिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017Navi Mumbaiनवी मुंबई