शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुले शोधताहेत घराबाहेर प्रेमाचा ‘आधार’; बेपत्ता ३२५ जणांचा लागला शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 07:58 IST

गेल्या वर्षभरात बेपत्ता ३७१ मुलांपैकी ३२५ जणांचा लागला शोध

सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई : शहरातून अल्पवयीन मुले, मुली बेपत्ता होत असून, अशा घटनांनी पालक चिंतित आहेत, तर बेपत्ता होणारी मुले अल्पवयीन असल्याने याप्रकरणी संबंधितांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास केला जातो. अशाच प्रकारातून चालू वर्षात ११ महिन्यांत नवी मुंबई पोलिस आयुक्तालय क्षेत्रातून ३७१ मुले बेपत्ता झाली असता ३२५ जणांचा शोध लागला असून, ४६ जणांची कसलीही माहिती समोर आलेली नाही.

चालू वर्षात ११ महिन्यांत नवी मुंबईसह पनवेलमधून ३७१ अल्पवयीन मुले बेपत्ता झाली होती. यासंबंधीची तक्रार प्राप्त होताच स्थानिक पोलिस तसेच गुन्हे शाखेकडून तपास करण्यात आला. त्यामध्ये ३२५ बालकांचा शोध लागला असल्याचे गुन्हे शाखा पोलिस उपायुक्त अमित काळे यांनी सांगितले, 

सर्वांच्या बेपत्ता होण्यामागे कौटुंबिक, तसेच प्रेमसंबंधाचे कारण समोर आले आहे. पालकांकडून मुलांना प्रेम मिळत नसल्याने ही मुले इतरांच्या आहारी जात असावीत. - अमित काळे, उपायुक्त, गुन्हे शाखा.

एक ना अनेक कारणेअल्पवयीन मुले बेपत्ता होण्यामागे कौटुंबिक कारणांसह प्रेमप्रकरण अशी कारणे समोर आली आहेत, तर बेपत्ता झालेली व मिळून आलेली सर्व मुले, मुली ही मध्यमवर्गीय व गरीब कुटुंबातील आहेत. नोकरी, व्यवसायामुळे घराबाहेर असणाऱ्या या कुटुंबांतील मुला-मुलींना पालकांकडून प्रेमाचा आधार मिळत नाही. लग्नाचे आमिष दाखवून त्यांना पळवून नेल्याचेही अनेक घटनांमध्ये समोर आले आहे.

अफवांमुळे पालक चिंतितशहरातून अल्पवयीन मुलांचे अपहरण होत असल्याच्या अफवांचे पीक मागील काही दिवसांपासून उठले आहे. यामागे वेगवेगळ्या कथा जोडल्या जात असल्याने लहान मुलांचे पालक चिंतित झाले आहेत; परंतु अल्पवयीन मुले बेपत्ता होण्यामागे कौटुंबिक तसेच खासगी कारणे असल्याचे बहुतांश घटनांमध्ये पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्यामुळे मुले बेपत्ता होण्यामागे शहरात कोणतीही टोळी सक्रिय नसल्याचे पोलिसांकडून स्पष्ट केले जात आहे.