शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासकीय ध्येय धोरणांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 23:55 IST

शासनाच्या माध्यमातून देण्यात येणारी जबाबदारी सकारात्मक रीतीने सांभाळून प्रशासकीय ध्येय धोरणांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणार असल्याचा निर्धार श्रुतीशा यांनी लोकमत कडे व्यक्त केला आहे.

योगेश पिंगळे नवी मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने २0१९ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत नेरुळ येथील श्रुतीशा पटाडे (२५) यांनी उज्वल यश संपादन केले असून त्यांची उपजिल्हाधिकारी पदावर निवड झाली आहे. शासनाच्या माध्यमातून देण्यात येणारी जबाबदारी सकारात्मक रीतीने सांभाळून प्रशासकीय ध्येय धोरणांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणार असल्याचा निर्धार श्रुतीशा यांनी लोकमतकडे व्यक्त केला आहे.आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो.परंतु त्यासाठी काहीतरी करण्याची संधी हि प्रशासनातूनच मिळेल या भावनेतून इंजिनियरिंग केल्यावर श्रुतीशा यांनी नोकरी न करता पूर्णवेळ स्पर्धा परीक्षांचा जिद्दीने अभ्यास केला. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्यांना घवघवीत यश देखील मिळाले असून उपजिल्हाधिकारी पदासाठी निवड झाली आहे. या यशामुळे श्रुतीशा यांचे प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. श्रुतीशा यांचे बालपण नवी मुंबईत गेले असून वाशीतील फादर अ‍ॅग्नेल शाळेत शिक्षण झाले आहे. वडील सुभाष पटाडे एका खाजगी कंपनीत नोकरी करीत असून आई सविता पटाडे गृहिणी आहेत. दहावीनंतर विविध पुस्तके, वर्तमानपत्र आदी अवांतर वाचनातून आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती मिळते त्यातूनच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कामाबाबत कुतूहल निर्माण झाल्याचे श्रुतीशा यांनी सांगितले. प्रशासकीय अधिकारी होऊन चांगलं काम करता येऊ शकते. तसेच या कामात खूप संधी आहेत. परंतु हे काम एक आव्हानात्मक असल्याचे देखील त्यांच्या लक्षात आले होते. परंतु प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करायचे असल्याने त्याअनुषंगाने त्यांनी प्रयत्न करून यश संपादन केले. आहे. मुंबईसारख्या ठिकाणी घरी अभ्यास करणे जरा कठीण असल्याने लायब्ररीमध्ये जाऊन त्यांनी अभ्यास केला होता. स्वप्न गाठण्यासाठी चिकाटीने केलेल्या मेहनतीचे फळ श्रुतीशा यांना मिळाले आहे. सकारात्मक दृष्टीकोनातून उपजिल्हाधिकारी पदावर काम करणार असून शासनाने दिलेली जबाबदारी १00 टक्के देऊन पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासनाची ध्येय, धोरणे, योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करणार असून जास्तीत जास्त महिलांचे सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे श्रुतीशा यांनी सांगितले. महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहाव्यात यासाठी महिलांना शिक्षण, प्रशिक्षण, रोजगार उपलब्ध करून देणं हे सर्व शासनामार्फत जेवढं शक्य होईल तेवढं करण्याचा नक्की प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितलं जीवनात आपण आपले ध्येय निश्चित केले तर आपण परिस्थिती नक्कीच बदलू त्यासाठी जिद्द, चिकाटी, विश्वासाची साथ हवी. ध्येय पूर्ण करण्यासाठी चांगले प्रयत्न देखील आवश्यक असून आपल्या आयुष्यात येणाºया प्रत्येक गोष्टीकडे संधी म्हणून बघा. यश हमखास आहे. असा सल्ला त्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाºया तरुणाईला दिला आहे. श्रुतीशा यांच्या यशाबद्दल त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.>श्रुतीशा यांचे बालपण नवी मुंबईत गेले असून वाशीतील फादर अ‍ॅग्नेल शाळेत शिक्षण झाले आहे. वडील सुभाष पटाडे एका खाजगी कंपनीत नोकरी करीत आहेत.