शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

२० ग्राहकांसह ३१ बारबालांनी गजबजला होता ‘आदर्श’ बार; कारवाई करून कोपरखैरणे पोलिसांनी दिला दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 08:49 IST

कोपरखैरणेतील आदर्श बारला पोलिसांनी पुन्हा एकदा दणका दिला.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : कोपरखैरणेतील आदर्श बारला पोलिसांनी पुन्हा एकदा दणका दिला. छोटेखानी जागेत डान्सबार चालवला जात होता. याची माहिती मिळताच कोपरखैरणे पोलिसांनी रविवारी रात्री धाड टाकली. या कारवाईत बारमधून ३१ बारबाला, २० ग्राहक, तसेच ४ वेटर यांना ताब्यात घेतले. 

रहिवासी क्षेत्रात व रहदारीच्या मुख्य रस्त्याला लागूनच हा बार असल्याने तिथल्या अवैध धंद्यांबाबत नागरिकांमधून तक्रारी येत होत्या. परंतु, आस्थापनेत केवळ सर्व्हिस बार चालत असल्याचा दिखावा करून आतला गैरप्रकार दडपला जात होता. मात्र, आस्थापना चालकांचे वाढते धाडस गांभीर्याने घेत कोपरखैरणेचे वरिष्ठ निरीक्षक औदुंबर पाटील यांनी दोन पथकांमार्फत डान्सबारमध्ये व बाहेर सापळा लावून रविवारी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास कारवाई केली.

महापालिकेला जाग येईल काय?बारच्या तळमजल्यावर मागील अनेक वर्षांपासून अनधिकृत बांधकाम करून बार चालवला जात आहे. शिवाय बाहेरील बाजूस उघड्यावर ग्राहकांना मद्यपानासाठी बसण्याची सोय केलेली आहे. यामुळे भोवतालच्या इमारतींमधील रहिवाशांना रोज नाईलाजास्तव तळीरामांचे दर्शन घ्यावे लागत आहे. नवी मुंबई महापालिकेने यापूर्वी दोनदा दिखाऊ कारवाई केल्यानंतरही तिथले अनधिकृत बांधकाम हटू शकलेले नाही. त्यामुळे अनधिकृत बांधकामाच्या माध्यमातून तिथे अनधिकृत बार चालत असतानाही प्रशासन सुस्त असल्याचे आश्चर्य देखील व्यक्त होत आहे. मात्र, रविवारी रात्री पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाला जाग येईल का, असा प्रश्नही नागरिक उपस्थित करत आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई