शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अदानींचा अलिबागमधील सिमेंटचा प्लांट राज्याने नाकारला

By नारायण जाधव | Updated: April 18, 2024 09:09 IST

प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतलेली सुनावणी वादाच्या भोवऱ्यात

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई:  रायगड जिल्ह्यातील अलिबागनजीकच्या शहाबाज गावात सिमेंट प्लांट उभारण्याचा अदानी सिमेंटेशन कॉर्पोरेशनचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने नाकारला असल्याची माहिती आरटीआयअन्वये उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे एप्रिल २०२१ मध्येच हा प्रकल्प नाकारण्यात आला असला, तरी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अलिबाग तालुक्यातील पोयनाड येथे एक वर्षानंतर एप्रिल, २०२२ मध्ये सार्वजनिक सुनावणी घेतल्याचे उपलब्ध कागदपत्रे दाखवितात. 

नवी मुंबईतील नॅट कनेक्ट फाउंडेशनने मार्च २०२२ मध्ये राज्य पर्यावरण विभागाकडे अदानी सिमेंट प्लांट आणि शहापूर व शाहबाज गावांमध्ये तयार केल्या जाणाऱ्या संबंधित सुविधांशी पर्यावरण प्रभाव मूल्यांकनाचा तपशील मागवून एक अर्ज दाखल केला होता. 

योजनेत २५ कोटी गुंतविण्याची योजना जनसुनावणीत प्रकल्प व्यवस्थापकांनी केलेल्या सादरीकरणात अदानी सिमेंटची पर्यावरण व्यवस्थापन योजनेत २५ कोटी गुंतविण्याची योजना होती. ‘एमपीसीबी’ने प्रकाशित केलेल्या प्रकल्पाच्या माहितीत म्हटले आहे की, ‘प्रस्तावित उपक्रमांचा पर्यावरणावर परिणाम होईल’ आणि म्हणून योग्य पर्यावरण व्यवस्थापन योजना आवश्यक आहे.  

प्रभावामध्ये पाण्याची गुणवत्ता, गाळाची गुणवत्ता, पेलाजिक आणि बेंथिक उत्पादक निवासस्थान आणि पर्यावरणाच्या अखंडतेवर संभाव्य परिणामांचा समावेश होतो. 

प्रस्तावित प्रकल्पाच्या विकासामुळे स्थानिक लोकांना सीएसआर उपक्रमांद्वारे भौतिक पायाभूत सुविधा, सामाजिक पायाभूत सुविधा, रोजगार मिळणार होते, तसेच  गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी तो आवश्यक असला, तरी  पर्यावरण रक्षणाशी समतोल साधला गेला पाहिजे, असे कुमार म्हणाले.

सरकारने जनसुनावणी घेतली कशी?राज्य पर्यावरण मूल्यमापन समितीच्या शिफारशींनुसार कंपनीचा प्रस्ताव नाकारल्याचे पत्रात नमूद असले, तरी पत्रात तपशील दिलेला नाही. यामुळे माहितीसाठी आता आरटीआय कायद्यांतर्गत नवीन अर्ज दाखल केल्याचे कुमार यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी पर्यावरण मंजुरी नाकारल्यानंतर सरकारने जनसुनावणी कशी घेतली? अंबा नदीच्या तीरावर प्रस्तावित असलेला हा प्रकल्प सिमेंट ग्राइंडिंगसाठी होता. ज्याची सिमेंट उत्पादन क्षमता वर्षाला ३ टन आणि दोन टन फ्लाय ॲश प्रक्रिया क्षमता होती. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई