शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई होणार?

By admin | Updated: October 16, 2015 02:32 IST

दिघा परिसरात अनधिकृत ईमारती बांधून ३,५४९ कुटुंबीयांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरांवर काय कारवाई केली अशी विचारणा उच्च न्यायालयाने केली आहे.

नामदेव मोरे, नवी मुंबई दिघा परिसरात अनधिकृत ईमारती बांधून ३,५४९ कुटुंबीयांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरांवर काय कारवाई केली अशी विचारणा उच्च न्यायालयाने केली आहे. यामुळे आता अतिक्रमण बांधणाऱ्यांवरही गुन्हे दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे सामान्य नागरिकांना फसविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. सुनियोजित शहर असणाऱ्या नवी मुंबईमध्ये भुमाफीयांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यास सुरवात केली आहे. दिघा परिसरात सिडको व एमआयडीसीच्या जागेवर तब्बल ९९ अनधिकृत ईमारती उभारण्यात आल्याची तक्रार २००९ मध्ये सामाजीक कार्यकर्ते राजीव मिश्रा यांनी केली होती. परंतू महापालिकेसह इतर प्रशासनाने काहीच कारवाई केली नसल्याने त्यांनी न्यायालयात जनहीत याचीका दाखल केली. उच्च न्यायालयाने सर्व अनधिकृत ईमारती पाडण्याचे आदेश दिले असून प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. यामुळे या ईमारतींमध्ये घर घेणारे ३२६० व व्यवसायीक गाळे घेणाऱ्या २८९ जणांचे जवळपास अडीचशे कोटी रूपयांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेकांनी आयुष्यभर कमावलेली रक्कम व कर्ज घेवून या इमारतींमध्ये घरे घेतली आहेत. या सर्व रंिहवाशांची फसवणूक झाली आहे. बांधकाम व्यवसायीकांनी कोणतीही बांधकाम परवानगी न घेता ईमारती उभ्या केल्या आहेत. येथील घरे सामान्य नागरिकांना विकून प्रचंड पैसा कमाविला आहे. या प्रकरणी बिल्डरांवर कारवाई होणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरू लागली होती. परंतू महापालिका , सिडको व एमआयडीसी प्रशासनाने कोणाही विरोधात गुन्हे दाखल केले नव्हते. तक्रार नसल्यामुळे पोलिसांनीही गुन्हे दाखल केले नव्हते. कारवाई होत नसल्यामुळे अनधिकृत बांधकाम करणारांचे मनोबल वाढत आहे. शहरात अनेक ठिकाणी अद्याप अनधिकृत बांधकामे सुरूच आहेत. जो पर्यंत बांधकाम करणाऱ्यांवर व त्यांना अभय देणाऱ्यांवर कडक कारवाई होणार नाही तो पर्यंत अतिक्रमणे थांबणार नाहीत. संबंधीतांवर गुन्हे दाखल करणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.