शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

बावखळेश्वर मंदिरावर कारवाई अटळ, सर्वोच्च न्यायालयाचा दणका, १५ फेब्रुवारीपर्यंत बांधकाम काढून टाकण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 01:35 IST

बहुचर्चित बावखळेश्वर मंदिरावरील कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शिक्कामोर्तब झाले आहे. मंदिर ट्रस्टच्या वतीने कारवाई टाळण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यात आले होते.

नवी मुंबई : बहुचर्चित बावखळेश्वर मंदिरावरील कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शिक्कामोर्तब झाले आहे. मंदिर ट्रस्टच्या वतीने कारवाई टाळण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यात आले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाने हे अपील फेटाळून लावत उच्च न्यायालयाचे आदेश कायम ठेवले आहेत. तसेच १५ फेब्रुवारीपर्यंत मंदिर ट्रस्टने स्वत:हून मंदिराचे बांधकाम तोडले नाही, तर एमआयडीसीने पोलीस बळाचा वापर करून हे बांधकाम पाडून टाकावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.पावणे एमआयडीसीत २००७मध्ये सुमारे २ हजार चौरस मीटर जागेवर हे मंदिर उभारण्यात आले आहे. २०१०मध्ये एमआयडीसीने या मंदिराला नोटीस बजावली होती. यासंदर्भात समाजसेवक संदीप ठाकूर यांनी २०१३मध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार मे २०१७मध्ये उच्च न्यायालयाने हे मंदिर तोडण्याचे आदेश दिले होते. या आदेशाच्या विरोधात मंदिर ट्रस्टने सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. त्यावर सोमवारी सुनावणी झाली. या मंदिराची जमीन बाजारभावाने विकत घेण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी मंदिर ट्रस्टच्या वतीने न्यायालयात करण्यात आली. परंतु एमआयडीसी आणि याचिकाकर्ते संदीप ठाकूर यांच्या वकिलांनी यावर हरकत घेत ही जागा ओपन स्पेसची असून ती विकता येत नाही, असे सांगितले. दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत मंदिराच्या बांधकामांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे मंदिर वाचविण्यासाठी ट्रस्टच्या प्रयत्नांना पूर्णविराम मिळाला आहे...तर पोलीस बळाचा वापरमंदिराचे बांधकाम स्वत:हून तोडण्यासाठी ट्रस्टने १५ फेब्रुवारीपर्यंतची मुदत मागत तसे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले आहे.या मुदतीच्या आत ट्रस्टने मंदिराचे बांधकाम पाडून टाकले नाही, तर एमआयडीसीने पोलीस बळाचा वापर करून त्यावर कारवाई करावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

टॅग्स :Courtन्यायालय