शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

उद्यान घोटाळ्यातील सहभागींवर कारवाई, तपासणी न करताच बिलांना मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2020 00:43 IST

Navi Mumbai : नवी मुंबई परिसरातील उद्यानांची देखभाल करण्यासाठी परिमंडळनिहाय ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. ठेकेदाराने काम केले नसतानाही जवळपास ८ कोटी रुपये त्यांना देण्यात आले होते.

नवी मुंबई : महानगरपालिकेतील उद्यान विभागामधील घोटाळ्या प्रकरणी निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना नोटीस देण्यात आली आहे. ठेकेदाराने न केलेल्या कामाचेही त्याला बिल देण्यात आले असून अस्तित्वात नसलेल्या भूखंडाच्या देखभालीसाठीही बिल देण्यात आले. या घोटाळ्याची सखोल चौकशी होणार असून सहभागी असणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.नवी मुंबई परिसरातील उद्यानांची देखभाल करण्यासाठी परिमंडळनिहाय ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. ठेकेदाराने काम केले नसतानाही जवळपास ८ कोटी रुपये त्यांना देण्यात आले होते. या प्रकरणी आमदार मंदा म्हात्रे यांनी आवाज उठविल्यानंतर मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी ठेकेदाराने केलेल्या कामाची चौकशी सुरू केली होती. दोन पथके तयार करून सर्व उद्यानांना भेटी देऊन केलेल्या कामांची पाहणी करण्यात आली. पाहणीत ठेकेदाराने न केलेल्या कामांसाठीही त्यांना बिले देण्यात आली आहेत. ज्या ठिकाणी सीएसआर तत्त्वावर हिरवळीची देखभाल केली जाते. तेथील देखभालीसाठीही २ हजार चौरस मीटर भूखंड अस्तित्वात नसताना बिले देण्यात आली आहेत. जवळपास १ लाख चौरस मीटर क्षेत्रफळ भूखंडासाठी अतिरिक्त शुल्क देण्यात आल्याचे आयुक्तांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत निदर्शनास आले आहे. तसेच, उद्यान विभागामध्ये घोटाळा झाल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे आयुक्तांनी उद्यान विभागाचे उपआयुक्त, ८ उद्यान सहायक, २ अधीक्षक, सहायक उद्यान अधिकारी या सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तीन दिवसांत संबंधितांनी उत्तर देणे अपेक्षित आहे. समाधानकारक उत्तर न दिल्यास त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई केली जाणार आहे. मनपाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ठेकेदाराने सादर केलेल्या माहितीपत्रकाची छाननी करणे आवश्यक होते. परंतु कोणत्याही प्रकारची छाननी न करता ती कागदपत्रे बिले देण्यासाठी सादर करण्यात आली असल्याचे निदर्शनास आले आहे.

निष्काळजीपणा भोवणारउद्यान विभागातील घोटाळा प्रकरणी अधिकारी व कर्मचाऱ्यांना नोटीस देण्यात आली आहे. शुक्रवारपर्यंत सर्वांनी नोटीसला उत्तर देणे अपेक्षित आहे. उत्तर न दिल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई