शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पामबीच रोडवर अतिवेगामुळे अपघात, सिग्नलचा पोल उखडला : कारचालकाविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 01:48 IST

पामबीच रोडवर सीबीडीकडून वाशीकडे जाणाºया मार्गिकेवर बीएमडब्ल्यू कारने आॅडीला व सिग्नलच्या पोलला धडक दिली. अपघातामध्ये सिग्नल मुळापासून उखडला. सुदैवाने यामध्ये कोणीही गंभीर जखमी झाले नाही.

नवी मुंबई : पामबीच रोडवर सीबीडीकडून वाशीकडे जाणाºया मार्गिकेवर बीएमडब्ल्यू कारने आॅडीला व सिग्नलच्या पोलला धडक दिली. अपघातामध्ये सिग्नल मुळापासून उखडला. सुदैवाने यामध्ये कोणीही गंभीर जखमी झाले नाही.सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास टी.एस. चाणक्य चौकाजवळ हा अपघात झाला. बीएमडब्ल्यू कारचालक अतिवेगाने वाशीच्या दिशेने जात होता. त्याचा कारवरील ताबा सुटल्याने त्याची कार एमएच ०४ एफझेड २२९० या आॅडी कारला धडक देत सिग्नलच्या पोलवर जाऊन आदळली. कारच्या धडकेने सिग्लन मुळापासून उखडला. रोडच्या कडेला लावलेले अ‍ॅल्युमिनिअम पट्ट्याचे बॅरिकेट्स उखडून कार रोडच्या बाजूला झाडीमध्ये जाऊन थांबली. कारमधील अत्याधुनिक यंत्रणेमुळे कारचालकास गंभीर दुखापत झाली नाही. सिग्नलच उखडल्यामुळे पामबीच रोडवर वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती. बघ्यांची गर्दी जमल्यामुळे वाहतूककोंडीही झाली होती. अपघाताचे वृत्त समजताच एनआरआय वाहतूक शाखेच्या कर्मचाºयांनी घटनास्थळी पोहोचून रोडमध्ये असलेली दुसरी कार बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.या प्रकरणी एनआरआय पोलीस स्टेशनमध्ये अपघाताची नोंद झाली आहे. अपघातामुळे टी. एस. चाणक्य चौकातील सिग्नल यंत्रणा बंद झाली आहे. सिग्नल बंद असल्यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता वाढली असून, वाहतूक पोलीस व महापालिका प्रशासनाकडे विनाविलंब युद्धपातळीवर सिग्नल यंत्रणा पूर्ववत करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.पामबीचवर पुन्हा स्पर्धा -प्रति तास ६० किलोमीटर वेगाने वाहने चालविता येतील अशाप्रकारे पामबीच रोडची रचना करण्यात आली आहे. परंतु या मार्गावर सरासरी ८० ते १५० च्या वेगाने वाहने चालविली जात आहे.याशिवाय पहाटे, मध्यरात्री व रविवारी मोटारसायकलपासून कारचालक स्पर्धा लावत आहेत. स्पर्धा लावणाºया वाहनांचा वेग ताशी १५० च्याही पुढे जात असून त्यांच्यावर आवार घालण्याची मागणी केली जात आहे.

टॅग्स :Accidentअपघात