शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

दोन ठिकाणी एनएमएमटी बसला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 23:28 IST

वाशीत दोन बसची धडक : पनवेलमध्ये ट्रकने धडक दिल्याने वाहतूककोंडी

नवी मुंबई : एनएमएमटी बसच्या अपघातांमध्ये वाढ होऊ लागली आहे. सोमवारी वाशीमध्ये दोन बसचा अपघात झाला. पनवेलमध्ये ट्रकने समोर उभ्या असलेल्या बसला धडक दिली. यामुळे पनवेल प्रांत कार्यालयाजवळ वाहतूककोंडी झाली होती.वाशी - तुर्भे मार्गावर सोमवारी दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. वाशीतून तुर्भेच्या दिशेने जाणारी बस शिक्षण महामंडळाच्या कार्यालयालगत आली असता ही दुर्घटना घडली. या वेळी समोर असलेली बस अचानक थांबली असता पाठीमागून आलेली एनएमएमटी तिला धडकली. सुदैवाने या वेळी बस कमी वेगात होती. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. मात्र धडकेमुळे एनएमएमटीच्या पुढच्या भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पनवेलमध्ये सोमवारी दुपारी १२च्या सुमारास एनएमएमटी (एमएच ४३,एच ५३८१) व ट्रक (एमएच ४६, एफ १००) या दोन वाहनांमध्ये अपघात झाला. प्रांत कार्यालयासमोरील मार्गावर वाहनांची नेहमीच वर्दळ असते. त्याच ठिकाणी अपघात झाला. अपघाताने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या अपघाताने या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही वाहनांना बाजूला करीत वाहतूककोंडी सोडविली. संबंधित घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पनवेल शहरात अवजड वाहनांना दिवसा बंदी असताना सर्रास अवजड वाहनांचा शिरकाव होत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमातील बसच्या अपघातांचे प्रमाण वाढत आहे. काही दिवसांपूर्वी उरणमध्ये बसमधील सीएनजीची गळती झाली होती. अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होऊ लागली आहे.

टॅग्स :Accidentअपघात