शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 04:20 IST

ऐरोली येथील पटणीसमोरील मार्गावर अपघातामध्ये पतीचा मृत्यू झाला असून पत्नी गंभीर जखमी झाली आहे.

नवी मुंबई : ऐरोली येथील पटणीसमोरील मार्गावर अपघातामध्ये पतीचा मृत्यू झाला असून पत्नी गंभीर जखमी झाली आहे. समोरून येणाऱ्या बसची दुचाकीला जोरदार धडक बसल्याने हा अपघात घडला. ऐरोली कोळीवाडा येथे राहणारे दाम्पत्य विटावा तेथे राहणा-या मुलीच्या भेटीसाठी जात असताना त्यांच्यासोबत हा अपघात घडला.ज्ञानेश्वर मढवी (५८) असे मयत व्यक्तीचे नाव असून ते ऐरोली कोळीवाडा येथील राहणारे आहेत. रविवारी दुपारी ते पत्नी मीना यांच्यासोबत विटावा येथे राहणाºया मुलीच्या भेटीसाठी चालले होते. यावेळी मढवी यांची मोटारसायकल (एमएच ४३ ए.एम. ४६९१) पटणी पार्कसमोरील मार्गावर आली असता अपघात झाला. त्याठिकाणी समोरून येणाºया खासगी बस व दुचाकीमध्ये जोराची धडक झाली. यामध्ये बस चालकाचा देखील ताबा सुटून बस रस्त्यालगतच्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या कठड्याला धडकली. तर दुचाकीवरील ज्ञानेश्वर मढवी व त्यांची पत्नी मीना हे दोघेही बसच्या धडकेने गंभीर जखमी होवून जमिनीवर कोसळले होते. काही प्रत्यक्षदर्शींनी अपघाताची माहिती पोलिसांना देवून जखमी दाम्पत्याला कळवा येथील रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी ज्ञानेश्वर यांना मृत घोषित करण्यात आले. तर पत्नी मीना यांची प्रकृती चिंताजनक असल्याने उपचारासाठी त्यांना ठाण्यातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच रबाळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. त्यामुळे बसच्या चालकाविषयी अधिक माहिती कळू शकलेली नाही.

टॅग्स :AccidentअपघातNavi Mumbaiनवी मुंबई