शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

विरार-वसई-पनवेल दुपदरीकरणासह कळवा-ऐरोली लिंकला गती

By नारायण जाधव | Updated: August 11, 2022 15:18 IST

एमयुटीपी-३ ला राज्य शासनाचा ४५ कोटींचा बुस्टर

 - नारायण जाधवलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : महामुंबईतील उपनगरीय सेवांमध्ये सुधारणा करून विविध सेवा पुरविण्यासाठी रेल्वे विकास महामंडळाकडून एमयुटीपी-३ हा १० हजार ९४७ कोटी रुपयांचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. यात केंद्र आणि राज्य शासनाची ५०/५० टक्के हस्सेदारी असून ही रक्कम टप्प्याटप्प्याने वितरीत करावयाची आहे. यातील एमआरव्हीसीच्या मागणीनुसार राज्याच्या नगरविकास विभागाने बुधवारी आणि ४५ काेटी २२ लाख ७८ हजार रुपये वितरीत करण्यास मान्यता दिली. यामुळे एमयुटीपी-३ मधील अनेक कामांना गती मिळणार आहे.

आतापर्यंत दिले होते ५२ कोटीयानुसार राज्य शासनाने आतापर्यंत २०२०-२१ मध्ये १५ काेटी तीन लाख ४४ हजार तर २०२१-२२ मध्ये ३७ कोटी ३१ लाख ४३ हजार असे ५२ कोटी ३४ लाख ८७ हजार रुपये वितरीत केलेले आहेतकाय आहे एमयुटीपी-३ चा करारनामाएमयुटीपी-३ राबविण्यासाठी एसबीआय बँकेने ३५०० कोटी रुपये कर्ज मंजूर केले असून याठी केंद्र शासन, महाराष्ट्र शासन, एसबीआय आणि एमआरव्हीसी यांच्यात २४ ऑगस्ट २०२० रोजी करारनामा झालेला आहे. तर या प्रकल्पासाठीची राज्य शासनाच्या वतीने वहन एमएमआरडीए आणि सिडकोने वहन कराववयाीच रक्कम विविध हप्त्यांमध्ये एमआरव्हीसीला द्यायची आहे. यानंतर एमआरव्हीसीने खर्च केलेल्या कामांची दावे एसबीआयला सादर करावयाचे असून त्यानुसार तेवढी रक्कम एसबीआय केंद्र सरकारला कर्ज स्वरुपात देत आहे. हे कर्ज फेडीसाठी तिकिटावर अधिभार आकारून फेडण्याचेही निश्चित झाले आहे

एमयुटीपी ३ मधील कामेविरार-वसई-पनवेल ७०.१४ किमीच्या दुपदरीकरणामुळे विरार आणि पनवेल ही दोन शहरे लोकलने जोडली जाणार आहेत. तर कळवा-ऐरोली एलिव्हेटेड लिंकमुळे कल्याणमधील प्रवाशांना ठाण्याला न उतरता वाशी गाठणे सोपे होणार आहे. कल्याण ते नवी मुंबईदरम्यान ४० फेऱ्या चालवणे शक्य होणार आहे. यामार्गावर दिघा रेल्वे रेल्वे स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.तसेच ‘परे’च्या विरार-डहाणू चौपदरीकरणामुळे मेल/एक्स्प्रेससाठी स्वतंत्र मार्गिका करून लोकल, मेल/एक्स्प्रेस सेवा स्वतंत्रपणे चालवण्यात येणार आहेत.