शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
2
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
3
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
4
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
5
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
6
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
7
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
8
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
9
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
10
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
11
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
12
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
13
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
14
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
15
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
16
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
17
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
18
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
19
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
20
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प

एबीटी दहशतवाद्यांचा शहराला धोका; बांगलादेशींना आधारसह पॅनकार्ड काढून देणारेही गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 03:41 IST

अन्सारुल्ला बांगला टीम (एबीटी) या दहशतवादी संघटनेने भारतात जाळे विणण्यास सुरुवात केली आहे. १३ मार्चला पनवेलमध्ये पाच संशयितांना अटक करण्यात आली. या बांगलादेशी नागरिकांना पॅनकार्ड व आधार कार्ड मिळवून देणाऱ्या आरोपीसही खारघर व उल्हासनगरमधून अटक केली.

- नामदेव मोरेनवी मुंबई : अन्सारुल्ला बांगला टीम (एबीटी) या दहशतवादी संघटनेने भारतात जाळे विणण्यास सुरुवात केली आहे. १३ मार्चला पनवेलमध्ये पाच संशयितांना अटक करण्यात आली. या बांगलादेशी नागरिकांना पॅनकार्ड व आधार कार्ड मिळवून देणाऱ्या आरोपीसही खारघर व उल्हासनगरमधून अटक केली. या घटनेमुळे नवी मुंबई, पनवेल परिसरामध्येही एटीबीच्या सदस्यांनी आश्रय घेतल्याचे स्पष्ट होवू लागले आहे. बेकायदेशीरपणे आश्रय घेणाºया बांगलादेशी नागरिकांवर ठोस कारवाई केली नाही तर त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.बोधगया येथे २० जानेवारीला जिवंत बॉम्ब सापडल्यानंतर अन्सारुल्ला बांगला टीम अर्थात एबीटी या दहशतवादी संघटनेविषयी देशातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. दोन वर्षापूर्वी बांगलादेशमध्ये बंदी घातलेल्या या संघटनेने देश- विदेशात जाळे निर्माण करण्यास सुरवात केली आहे. भारतामध्ये अवैधपणे वास्तव्य करणाºया बांगलादेशी नागरिकांच्या मदतीने हे दहशतवादी त्यांच्या कारवाया करू लागले आहेत. बांगलादेशी नागरिक त्यांना येथे आश्रय देवून पॅनकार्ड व आधार कार्ड काढण्यास मदत करू लागले आहेत. पनवेलमध्येही एबीटीच्या संशयितांनी आश्रय घेतला असल्याची माहिती एटीएसच्या नवी मुंबई युनिटला मिळाली होती. या माहितीच्या आधारे १३ मार्चला पनवेलमधील जुई गावामध्ये धाड टाकली. त्याठिकाणी २० ते ३५ वर्षे वयोगटातील पाच बांगलादेशी नागरिक आढळून आले. हे सर्व बांगलादेशमधील बिष्टिपूर, नरर, जयसूर, सातखरा व बरीयाळमधील रहिवासी आहेत.एटीएसच्या पथकाला पाचपैकी चार जणांकडे आधार कार्ड आढळून आले आहेत. बांगलादेशींकडे आधार कार्ड सापडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आरोपींकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी प्रथम पॅनकार्ड मिळविले व त्याच्या आधारे आधारकार्ड काढल्याचे स्पष्ट झाले. कसून तपास केल्यानंतर खारघरमधील एका एजंटकडून पॅनकार्ड काढल्याचे स्पष्ट झाले. एटीएसने त्या एजंटला अटक केली आहे. एक पॅनकार्ड काढण्यासाठी ७०० रुपये शुल्क आकारले जात होते. यामधील ३५० रुपये उल्हासनगरमधील व्यक्तीला दिले जात होते. उल्हासनगरमधील अटक आरोपीने आतापर्यंत १५०० बनावट पॅनकार्ड काढल्याचे तपासात उघड झाले आहे. खारघरमधील व्यक्तीने आतापर्यंत १०० जणांना पॅनकार्ड वाटले असून त्याचा वापर करून आधार कार्ड बनविण्यात आले आहे.एटीएसच्या या कारवाईमुळे बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न किती गंभीर आहे हे निदर्शनास आले आहे. नवी मुंबई, पनवेल परिसरामध्ये बांधकाम मजूर व कारखान्यांमध्ये बांगलादेशी वास्तव्य करत असल्याचे यापूर्वी पोलिसांनी केलेल्या कारवाईत स्पष्ट झाले आहे. एपीएमसीमध्येही अनेक वेळ बांगलादेशींना अटक केली आहे. कमी वेतनामध्ये मजूर उपलब्ध होत असल्यामुळे घुसखोरांना कामावर ठेवले जाते. जास्त पैसे मिळत असल्याने घर भाड्याने दिले जात असून एजंट पैशांसाठी आधार व पॅनकार्ड बनवून देत आहेत.पालिका शाळेत बांगलादेशी मुलेनवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये बांगलादेशी मुले शिक्षण घेत असल्याचा आरोप यापूर्वी शिवसेना नगरसेवक सोमनाथ वास्कर यांनी केला होता. सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत वास्तव्याचे पुरावे नसलेल्यांनाही शाळेत प्रवेश दिला जातो. या आधारे बांगलादेशी मनपा शाळेत प्रवेश घेतात. पुढे मुलाच्या दाखल्याच्या सहाय्याने पूर्ण कुटुंबाच्या वास्तव्याचे पुरावे तयार केले जातात. काही दिवसांपूर्वी स्थायी समितीमध्ये शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनीही मनपाच्या शाळांमध्ये बांगलादेशी मुले आहेत. याविषयी गांभीर्याने भूमिका घ्यावी असे मत व्यक्त केले होते. परंतु प्रशासनाने याविषयी काहीही कार्यवाही केलेली नाही.कमी पैशातील मजूरबांगलादेशी नागरिकांना नवी मुंबई,पनवेलमधील एमआयडीसी व बांधकाम क्षेत्रात सहज नोकरी मिळत आहे. अत्यंत कमी पैशामध्ये बांगलादेशी काम करायला तयार होतात. यामुळे कारखानदार व ठेकेदार त्यांना नोकरीवर ठेवत आहेत. वास्तविक विदेशी नागरिक असल्याचा संशय आल्यास किंवा खात्री पटल्यास पोलिसांना माहिती दिली पाहिजे. पण प्रत्यक्षात स्वत:च्या फायद्यासाठी बांगलादेशींना आश्रय दिला जात असून भविष्यात देशाच्या सुरक्षेसाठी धोका पोहचू शकतो.एपीएमसीचेही दुर्लक्षमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यापूर्वीही बांगलादेशी नागरिक सापडले आहेत. सद्यस्थितीमध्येही जवळपास दोन हजार परप्रांतीय विनापरवाना येथे वास्तव्य करत असून त्यामध्ये बांगलादेशींचा समावेश असल्याचा संशय आहे. यापूर्वीही एपीएमसीमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा अतिरेकी फारूख नायकूने आश्रय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. अतिरेकी सापडल्यानंतरही बाजार समिती प्रशासनाने सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना केलेल्या नाहीत.700रुपयांमध्ये पॅनकार्ड, आधारकार्डएबीटी ही दहशतवादी संघटना भारतामध्ये जाळे पसरवत आहे. यापूर्वीच देशभर घुसखोरी केलेल्या बांगलादेशी नागरिकांच्या मदतीने अतिरेकी वास्तव्य करत आहेत. बांधकाम मजूर व इतर ठिकाणी कामे करून महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी करत आहेत. बोधगया येथे जिवंत बॉम्ब सापडल्यानंतर देशभर धाडसत्र सुरू करण्यात आले आहे. पनवेलमध्ये केलेल्या कारवाईमध्ये बांगलादेशींना ७०० रुपयांमध्ये पॅनकार्ड बनवून दिले जात असल्याचे व त्याच्या सहाय्याने आधार कार्ड तयार केले जात असल्याचे स्पष्ट झाले असून एजंटनी पैशासाठी देशाच्या सुरक्षेशी खेळू नये, असे आवाहन केले जात असून अशाप्रकारे विदेशी नागरिकांना वास्तव्याचे पुरावे बनवून देणाºयांवर कडक कारवाई सुरू केली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईterroristदहशतवादी