शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अभय योजनेचा नवी मुंबईतील ६५० गृहनिर्माण सोसायट्यांना दिलासा, सिडकोत विकासकांची कार्यशाळा

By कमलाकर कांबळे | Updated: February 21, 2024 20:50 IST

मावेजासह अतिरिक्त भाडेपट्टा शुल्क आकारणीत सूट

कमलाकर कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: मावेजा आणि अतिरिक्त भाडेपट्टा शुल्काबाबत सिडकोने जाहीर केलेली अभय योजना सर्वसामान्यांना दिलासा देणारी आहे. त्यामुळे बंगलो किंवा रो-हाउसच्या भूखंडांवर बांधलेल्या एकापेक्षा अधिकच्या सदनिकांच्या हस्तांतरणाचा प्रश्न निकाली लागला आहे. त्याचप्रमाणे मावेजा वसुलीसाठी रखडलेल्या भोगवटा प्रमाणपत्र, भाडेकरार आणि अभिहस्तांरणाच्या प्रक्रियेला गती मिळेल, असा विश्वास विकासकांनी बुधवारी व्यक्त केला. तिचा ६५० गृहनिर्माण सोसायट्यांना दिलासा मिळणार असल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.सिडकोने मावेजा आणि अतिरिक्त भाडेपट्टा शुल्क आकारणीबाबत अलीकडेच अभय योजना जाहीर केली आहे. त्या अनुषंगाने क्रेडाई - एमसीएचआयच्या पुढाकाराने सिडको भवनमध्ये बुधवारी एक कार्यशाळा आयोजिली होती. अभय योजनेचा नवी मुंबईतील हजारो सदनिकाधारकांना लाभ होणार आहे.

प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यात येणाऱ्या साडेबारा टक्के योजनेच्या भूखंडांवर मावेजाची आकारणी तसेच सर्व प्रकारच्या भूखंडांवर लीज प्रीमिअम, बांधकामाला उशीर झालेल्या भूखंडावर सुमारे ११५ टक्के अतिरिक्त भाडेपट्टा शुल्क आकारणी, पायाभूत सुविधांच्या निर्मितीत होणारा विलंब, आदी प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी विनंती क्रेडाई एमसीएचआयने राज्य सरकारकडे केली होती. त्यानुसार राज्य सरकारने निवृत्त सनदी अधिकारी संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. तिच्या माध्यमातून या सर्व प्रश्नांवर काही शिफारशी केल्या होत्या. त्यांपैकी राज्य सरकारने बहुतांश शिफारशी मान्य केल्याचे समाधान यावेळी विकासकांनी व्यक्त केले. ही कार्यशाळा क्रेडाई - एसीएचआय (रायगड), क्रेडाई- एसीएचआय (नवी मुंबई), क्रेडाई - एसीएचआय (यूथ) आणि क्रेडाई - एसीएचआय (उरण द्रोणागिरी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली होती. यावेळी क्रेडाई एमसीएचआयच्या संबंधित सर्व युनिटचे पदाधिकारी, विकासक आणि सिडकोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई